Apple कंपनी ७० हजाराचा iPhone 11 बंद करण्याच्या मार्गावर?, फोनची किंमत ४५ हजारांनी कमी

नवी दिल्लीः Apple ने २०१९ मध्ये iPhone 11 ला लाँच केले होते. हा फोन सर्वात जास्त विकणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत समावेश आहे. याच्या मागे अनेक कारणे आहेत. खरं म्हणजे फोन मध्ये ड्युअल रियर कॅमेरा ऑप्शन दिला आहे. सोबत याचा प्रोसेसर सुद्धा वेगळा होता. डिझाइन सुद्धा जबरदस्त आहे. त्यामुळे या फोनला खरेदी करणे हे फायदेशीर ठरते. आता या फोनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे.

Apple iPhone 11 ला तुम्ही Flipkart वरून डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. या फोनची किंमत ४८ हजार ९०० रुपये आहे. या फोनवर ५ टक्के डिस्काउंट नंतर फोनला ४५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. Paytm Wallet च्या मदतीने पेमेंट केल्यानंतर १०० रुपयापर्यंत इंस्टेंट कॅशबॅक यूजर्सला मिळू शकते. एक्सचेंज ऑफर वर सर्वात मोठा डिस्काउंट मिळतो.

वाचाः एकदा रिचार्ज करा अन् २५२ दिवस टेन्शन फ्री राहा, जिओच्या या प्लानपुढे Airtel-Vi पडले मागे

जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून एक्सचेंज केल्यास २१ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी जुन्या फोनची कंडिशन चांगली असायला हवी. एक्सचेंज ऑफर अंतर्गत सूट मिळत असल्यास हा फोन ४५ हजार रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतो. आयफोन ११ च्या १२८ जीबी व्हेरियंटला कंपनीने ७० हजार रुपये किंमतीत लाँच केले होते.

वाचाः Disney+ Hotstar यूजर्ससाठी ‘बॅड न्यूज’; १ एप्रिलपासून ही सुविधा होणार बंद

iPhone 11 Specification
आयफोन ११ फीचर्स मध्ये एक नंबर फोन आहे. या फोनबद्दल अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. आयफोन ११ मध्ये ६.१ इंचाचा Liquid Retina HD Display दिला आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. तर फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा दिला आहे. या फोनमध्ये A13 Bionic Chip Processor दिले आहे. फोनची स्पीड सुद्धा चांगली आहे.

वाचाः 2GB डेटा प्लानमध्ये हा प्लान आहे सर्वात बेस्ट, कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग

Source link

iPhone 11iphone 11 discountiphone 11 featuresiphone 11 offer priceiphone 11 priceiPhone 11 With Discount
Comments (0)
Add Comment