Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Apple iPhone 11 ला तुम्ही Flipkart वरून डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. या फोनची किंमत ४८ हजार ९०० रुपये आहे. या फोनवर ५ टक्के डिस्काउंट नंतर फोनला ४५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. Paytm Wallet च्या मदतीने पेमेंट केल्यानंतर १०० रुपयापर्यंत इंस्टेंट कॅशबॅक यूजर्सला मिळू शकते. एक्सचेंज ऑफर वर सर्वात मोठा डिस्काउंट मिळतो.
वाचाः एकदा रिचार्ज करा अन् २५२ दिवस टेन्शन फ्री राहा, जिओच्या या प्लानपुढे Airtel-Vi पडले मागे
जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून एक्सचेंज केल्यास २१ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी जुन्या फोनची कंडिशन चांगली असायला हवी. एक्सचेंज ऑफर अंतर्गत सूट मिळत असल्यास हा फोन ४५ हजार रुपयांपर्यंत स्वस्तात मिळतो. आयफोन ११ च्या १२८ जीबी व्हेरियंटला कंपनीने ७० हजार रुपये किंमतीत लाँच केले होते.
वाचाः Disney+ Hotstar यूजर्ससाठी ‘बॅड न्यूज’; १ एप्रिलपासून ही सुविधा होणार बंद
iPhone 11 Specification
आयफोन ११ फीचर्स मध्ये एक नंबर फोन आहे. या फोनबद्दल अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही. आयफोन ११ मध्ये ६.१ इंचाचा Liquid Retina HD Display दिला आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. प्रायमरी कॅमेरा १२ मेगापिक्सलचा आहे. तर फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा दिला आहे. या फोनमध्ये A13 Bionic Chip Processor दिले आहे. फोनची स्पीड सुद्धा चांगली आहे.
वाचाः 2GB डेटा प्लानमध्ये हा प्लान आहे सर्वात बेस्ट, कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग