कॉपी बहाद्दरांना पास करण्याची उठाठेव नडली, चार शिक्षकांवर निलंबनाची कारवाई

HSC Exam: बुलढाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यात घडलेल्या बारावी गणित पेपरफुटीच्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. अटक केलेल्या सात आरोपींमध्ये सहभागी चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. निलंबनाची कारवाई केलेले सर्व शिक्षक स्वयंअर्थसाह्यीत शाळांमध्ये कार्यरत होते.

बारावी गणिताचा पेपर व्हायरल करणाऱ्यांमध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थांचे संचालक असून तेथेच शिक्षक म्हणून कार्य करत होते. त्याचप्रमाणे अ. अकील अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य होता आणि अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होता.

कॉपी प्रकरणात ‘विशेष लक्ष’ घालणे या चारही शिक्षकांना आता चांगलेच महागात पडले आहे. राज्यभर हे प्रकरण गाजले असून विधानसभेतही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पेपर फुटीचे प्रकरण रेटून धरले. त्यानंतर शासनाने तातडीने सुत्रे हलवली. प्रशासनाकडून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांची शोधमोहिम सुरू करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात हे चार शिक्षक आणि कॉपी पुरवण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या बाहेरच्या तीन जणांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलीय.आता या प्रकरणाचा सखोल तपास विशेष पथकाकडून करण्यात येत आहे.

पेपरफूटी प्रकरण एसआयटीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर यामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. चार शिक्षक निलंबित झाले, सात आरोपींना अटक झाली. पण तरी देखील मुंबई आणि राज्यात इतरत्र असलेल्या कनेक्शनच्या मास्टर माइंडपर्यंत गृह विभाग, पोलीस खाते केव्हा पोहोचणार? याकडे लक्ष लागले आहे.

Source link

Buldhana Copy IssueCopy in HSC ExamCopy IssueHSC ExamTeacher suspensionteachers Suspentकॉपी बहाद्दरचार शिक्षक निलंबितबारावी कॉपी प्रकरण
Comments (0)
Add Comment