Nothing Phone (2) चा डिस्प्ले
Nothing Phone (2) मध्ये FHD+ रिझॉल्यूशन सोबत AMOLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. हा 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. डिझाइनमध्ये हा स्मार्टफोन सुद्धा बॅक साइडमध्ये Glyph लाइटिंग सोबत येवू शकतो.
Nothing Phone (2) चा कॅमेरा
या स्मार्टफोन मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सोबत ड्युअल कॅमेरा-सेटअप दिला जावू शकतो. जो OIS सपोर्ट सोबत येईल. तर फ्रंट साइड मध्ये फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जावू शकतो.
Nothing Phone (2) ची परफॉर्मेंस
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, Nothing Phone (2) ला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर सोबत आणले जावू शकते. या स्मार्टफोन सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये Android 13 वर बेस्ड नथिंग ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते.
वाचाः Airtel च्या एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण फॅमिलीला बेनिफिट्स, १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Nothing Phone (2) ची बॅटरी
नवीन Nothing स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. हा फोन फास्ट चार्जिंग आणि वायरलेस फास्ट चार्जिंग दोन्हीला सपोर्ट करेल. अद्याप या फोनसंबंधी जास्त माहिती समोर आली नाही.
वाचाः PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून ‘असं’ चेक करा स्टेट्स