नवरदेवाचे वडील प्रल्हाद मीणा हे गुजरातच्या अहमदाबादमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळं नवरीच्या कुटुंबाला वरपक्षाचं वऱ्हाड अलिशान गाड्यामधून पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैलगाडी वऱ्हाडी पोहोचली आणि सगळेच पाहत राहिले.
रामगडच्या पचवारा येथील अमराबादचे रहिवासी भामाशाह प्रल्हाद मीणा यांनी त्यांचा मुलगा विनोद याच्या लग्नाचं वऱ्हाड बैलगाडी, ऊंट आणि घोड्यांवरुन नेलं. राजस्थानातील दौसामध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहेत. आधुनिक काळाती दिखाव्यापासून दूर राहत पारंपारिक पद्धतीनं बैलगाडीतून वऱ्हाडी पोहोचले. वरातीसाठी ऊंट आणि बैलांना देखील सजवण्यात आलं होतं.
ना राडा, ना गोंधळ; गौतमीचा कार्यक्रम पहिल्यांदाच शांततेत पार पडला; गावाचं परफेक्ट नियोजन
रस्त्यानं वऱ्हाडी निघाले असताना ग्रामीण भागातील लोक पाहत होते. आठ ऊंटगाड्या, ७ बैलगाड्या, १० ऊंट, १० घोड्यांवरुन वऱ्हाडी नवरी मुलीच्या घरी पोहोचले. पारंपारिक पद्धतीनं निघालेली वरात पाहायला गावोगावी लोक जमले होते. नवरदेव बैलगाडीतून नवरीच्या घरी पोहोचला. अमराबाद ते रायमलपूरा येथे पोहोचायला तीन तास लागले. सोबत डीजे देखील वाजत होता आणि वऱ्हाडी नाचत होते.
एका नारळावर आणि एका रुपयावर हे लग्न पार पडलं. नवरदेवाकडील मंडळी दाग दागिन्यांसह लग्नाला पोहोचले होते. समाजात हुंड्याचा मोठा प्रश्न आहे. ही प्रथा तोडण्याचं काम केल्याचं विनोद म्हणाला.
परंपरा कायम ठेवली
प्रल्हाद मीणा यांनी त्यांचं कुटुंब शेतकरी पार्श्वभूमीचं असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांना प्राण्यांचं महत्व असतं. पहिल्यावेळी बैलगाडीनं वराती यायच्या आता सगळं बदललं आहे. त्यामुळं जुन्या परंपरा तरुणांमध्ये नेण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं. नवरीनं देखील पूर्वीच्या काळी लग्नात वऱ्हाडी बैलगाडीनं यायचे. यावेळी देखील वऱ्हाडी बैलगाडीनं आल्यानं आनंद झाल्याचं म्हटलं.