ॲपलचे दुसरे स्टोअर दिल्लीत सुरू होणार
तर मुंबईतील Apple Store BKC येथे १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उघडेल. तर दिल्लीच्या साकेतमधील आणखी एक Apple स्टोअर २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उघडणार आहे. मुंबईशिवाय दिल्लीतही अॅपल स्टोअर हे १०,०००-१०,००० स्क्वेअर फूट मध्ये असेल. दिल्लीचे हे स्टोअर साकेतच्या सिटीवॉक मॉल याठिकाणी असणार आहे.
आयफोनचे उत्पादन भारतात सुरू होणार
इतकी जुनी आणि प्रसिद्ध कंपनी असूनही अॅपलचे स्टोअर याआधी भारतात का उघडले नाही? हा प्रश्न अनेकांना पडला असावा. तर परदेशी कंपन्यांना भारतात स्टोर नसताना अधिक फायदा होत होता. पण आता नव्या कायद्यानुसार भारतात उत्पादनांची निर्मिती आवश्यक होती. कारण मेड इन इंडिनुसार ३०% उत्पादने मेड इन इंडिया असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतात आयफोन बनवण्याच्या निर्णयानंतर कंपनीला स्टोअर उघडण्याची परवानगी मिळाली असून मुंबई आणि दिल्ली येथे स्टोअर ओपन होत आहे.
वाचाः Jio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…