Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अखेर तो दिवस उजाडणार! देशातील ॲपलचं पहिलं रिटेल स्टोअर मुंबईत या दिवशी उघडणार

27

नवी दिल्ली :Apple Retail Store BKC in India : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असं दिवसांपूर्वी ॲपलचं भारतातील पहिलं रिटेल स्टोअर मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये सुरू होणार आहे. बऱ्याच दिवसांपासून या स्टोरची चर्चा होती, ज्यानंतर आता फायनली अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यात आली आहे. ॲपलचं बीकेसीतील हे रिटेल स्टोअर १८ एप्रिल रोजी ओपन होणार आहे. तसंच भारतातील दुसरं ॲपल रिटेल स्टोअर दिल्लीच्या साकेत येथे २० एप्रिल रोजी उघडणार आहे.तर अॅपलचं हे मुंबईतील स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारखं भव्य असणार आहे. दरम्यान एका ब्लॉगपोस्टमध्ये Apple ने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडण्याची घोषणा केली होती. स्टोअरद्वारे, भारतातील ग्राहक नवीनतम तर अॅपल उत्पादनांचा अनुभव घेऊ शकतात. विशेष म्हणजे बीकेसीतील हा जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉल 22,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरला असल्याने हे अॅपल स्टोअरही अगदी भव्य असणार आहे.

ॲपलचे दुसरे स्टोअर दिल्लीत सुरू होणार
तर मुंबईतील Apple Store BKC येथे १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उघडेल. तर दिल्लीच्या साकेतमधील आणखी एक Apple स्टोअर २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उघडणार आहे. मुंबईशिवाय दिल्लीतही अॅपल स्टोअर हे १०,०००-१०,००० स्क्वेअर फूट मध्ये असेल. दिल्लीचे हे स्टोअर साकेतच्या सिटीवॉक मॉल याठिकाणी असणार आहे.

आयफोनचे उत्पादन भारतात सुरू होणार
इतकी जुनी आणि प्रसिद्ध कंपनी असूनही अॅपलचे स्टोअर याआधी भारतात का उघडले नाही? हा प्रश्न अनेकांना पडला असावा. तर परदेशी कंपन्यांना भारतात स्टोर नसताना अधिक फायदा होत होता. पण आता नव्या कायद्यानुसार भारतात उत्पादनांची निर्मिती आवश्यक होती. कारण मेड इन इंडिनुसार ३०% उत्पादने मेड इन इंडिया असणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतात आयफोन बनवण्याच्या निर्णयानंतर कंपनीला स्टोअर उघडण्याची परवानगी मिळाली असून मुंबई आणि दिल्ली येथे स्टोअर ओपन होत आहे.

वाचाः Jio ची भन्नाट ऑफर, ९१ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत OTT आणि बरच काही…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.