बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सूरत येथील काही संशोधकांनी 630 लोकांच्या आवाजाच्या नमुन्यांचा अभ्यास केला, त्यापैकी 111 लोकांना सर्दी झाल्याचे आढळून आले. सामान्य सर्दीबद्दल माहिती व्हावी म्हणून या लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीचे विश्लेषण ही करण्यात आले. अभ्यासात हार्मोनिक्स म्हणजेच स्वर लय वापरण्यात आली. कारण जेव्हा एखाद्या व्यक्ती सर्दी-खोकल्याने त्रस्त होते तेव्हा त्या व्यक्तीची आवाजाची पद्धतही बदलते. पण केवळ आवाज ऐकून नेमकं सांगता येणार नाही, त्यामुळे संशोधकांनी मशीन लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने लोकांच्या आवाजावरुन त्यांना सर्दी झालीये का नाही हे तपासण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
वाचा: अखेर तो दिवस उजाडणार! देशातील ॲपलचं पहिलं रिटेल स्टोअर मुंबईत ‘या’ दिवशी उघडणार
कशी करण्यात आली चाचणी?
या चाचणी दरम्यान, लोकांना १ ते ४० पर्यंत मोजण्यास आणि तसंच ‘द नॉर्थ विंड अँड द सन’ ही कथा वाचण्यास सांगितले होते. या अभ्यासात सुमारे 70% अचूकता दिसून आली. अभ्यासाचा एकमेव उद्देश डॉक्टरांकडे न जाता लोकांमध्ये सामान्य सर्दी आहे का? हे शोधणं हा होता. बिझनेस इनसाइडरच्या अहवालात असेही म्हटले आहे की हा अभ्यास व्यवसाय मालकांसाठी खूप फायद्याचा ठरु शकतो.
वाचा: iPhone 15 Pro : नवा आयफोन ठरणार गेम चेंजर, ‘या’ फीचर्सनी वाढवली चाहत्यांची उत्सूकता