पाटील यांना मिळालेली पदवी जुनी असल्याने ती मॅन्युअली असते. ती बाहेर प्रिंटिंग साठी पाठविली जात नाही. ती विद्यापीठ स्तरावर तयार केली जाते. या जुन्या पदवीचे फॉरमॅट तयार असतात. यावर विद्यार्थ्यांचा तपशील हस्ताक्षराने लिहिला जातो. यामुळे ही पदवी एका दिवसात तयार होते, असे विद्यापीठाने सांगितले.
काही विद्यार्थ्यांनादेखील कमी वेळात पदवी प्रमाणपत्र दिली आहेत. या पदवीसाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणताही दबाव आलेला नसल्याचे मुंबई विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करा अशी मागणी युवासेनेच्यावतीने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील यांना एका दिवसात पदवी प्रमाणपत्र दिलं हे मुंबई विद्यापीठाने हे मान्य केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी युवा सेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली आहे. पाटील यांना प्रक्रिया पूर्ण न करता हे प्रमाणपत्र दिले हे या स्पष्टीकरणातून स्पष्ट दिसत आहे. कारण २०१९ च्या मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकांनुसार कुठल्याही विद्यार्थ्याला पदवी प्रमाणपत्र हवे असेल तर त्याला वेबसाइट ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मात्र इथे हा अर्ज ऑफलाइन करून एका दिवसात पदवी प्रमाणपत्र मिळविले. या सगळ्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे स्पष्टीकरण साफ चुकीचे असल्याचे सावंत म्हणाले.