तर आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरनुसार रविवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ११,००० हून अधिक वापरकर्त्यांची Netflix सेवा बंद होती. डाउनडिटेक्टरला वापरकर्त्याकर्त्यांकडून आलेल्या रिपोर्ट्स मधून हे स्पष्ट झालं.
बराचवेळ बंद होती Netflix सेवा
डाऊन डिटेक्टरनुसार, सकाळी ५ वाजता ही गडबड लक्षात आली. जवळपास ६.४९ वाजता हा प्रॉब्लेम संपला. या आउटेजमुळे लव्ह इज ब्लाइंड: द लाइव्ह रीयुनियन या शोच्या प्रसारणास विलंब झाला. व्हेनेसा आणि निक लॅची हे होस्ट करणारा हा शो लॉस एंजेलिसमधून प्रसारित केला जाणार होता. नेटफ्लिक्स युजर्स शो सुरू होण्याच्या १० मिनिटं आधी शोच्या वेटिंग रूममध्ये सामिल झाले. पण नेटफ्लिक्स डाऊनमुळे हा शो वेळेवर सुरुच झाला नाही.
नेटफ्लिक्सने माफी मागितली
या सर्व प्रकाराबद्दल नेटफ्लिक्सने ट्विट करून युजर्सची माफी मागितली आहे. सकाळी सातच्या सुमारास Netflix नं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन ट्वीट केलं की,”उशीरा उठलेल्या, लवकर उठलेल्या, रविवारच्या दुपारी तुमचा आवडता शो चुकलेल्या प्रत्येकासाठी… आम्ही लव्ह ब्लाइंड लाइव्ह रीयुनियन शोला नियोजित वेळेप्रमाणे टेलिकास्ट करु शकतो नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आता त्याचं फिल्मिंग करत आहोत आणि शक्य तितक्या लवकर नेटफ्लिक्सवर तुमच्यासाठी घेऊन येऊ. पुन्हा, धन्यवाद आणि क्षमस्व.’
वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा