४२ लाख रुपये महिन्याचं भाडं
अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडलेल्या नवीन ॲपल स्टोअरसाठी ॲपल कंपनीला दरमहा मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, ॲपल अंबानी कुटुंबाला ॲपल स्टोअरसाठी दरमहा सुमारे ४२लाख रुपये भाडे देणार आहे. या स्टोअरसाठी ॲपलने अंबानीसोबत सुमारे २०,८०० स्क्वेअर फूट जागेसाठी 11 वर्षांचा करार केला आहे.
स्टोअर क्षेत्रासाठी किमान मासिक भाडे सुमारे ४२ लाख रुपये आहे. त्यानंतर दर तीन वर्षांनी भाडे १५ टक्क्यांनी वाढणार आहे. याशिवाय, ॲपलला पहिल्या तीन वर्षांसाठी २ टक्के आणि पहिल्या तीन वर्षानंतर २,५ टक्के महसूल द्यावा लागेल. ॲपलचा मुंबईतील अंबानींच्या मालकीच्या मॉलशी 11 वर्षांचा करार हा त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एक मोठं पाऊल आहे.
टीम कुकनेघेतलीअंबानींची भेट
ॲपल स्टोअर सुरू होण्याच्या एक दिवस आधी सोमवारी टीम कुक मुकेश अंबानींच्या घरी पोहोचले होते. अँटिलियाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते, ज्यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी ॲपलच्या सीईओसोबत दिसत होते.
वााच :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च