Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पैसा पैशाकडं जातो, Apple Store मधून अंबानी कुटुंबाला मिळणार महिन्याला 'इतके' भाडे

22

ॲपलमुंबई :Apple Store in BKC Mumbai : सुसज्ज, आलिशान आणि हटके असं ॲपल कंपनीचं अप्रतिम रिटेल स्टोर मुंबईच्या बीकेसी येथील रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आज (१८ एप्रिल) उघडलं आहे. विशेष म्हणजे हे मुंबईतीलच नाही तर संपूर्ण भारतातील पहिलंच Apple Store चं रिटेल उघडलं आहे. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील या पहिल्या ॲपल स्टोअरचं उद्घाटन केलं. तर स्टोर ज्या मॉलमध्ये उघडला आहे तो रिलायन्सच्या मालकीचा असल्याने स्टोर थेट रिलायन्सचे मालक अर्थात अंबानी कुटुंबाला भाडं देणार आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये सुरू झालेल्या या ॲपल स्टोअरला ॲपल बीकेसी असं नाव देण्यात आले आहे.

४२ लाख रुपये महिन्याचं भाडं

अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडलेल्या नवीन ॲपल स्टोअरसाठी ॲपल कंपनीला दरमहा मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, ॲपल अंबानी कुटुंबाला ॲपल स्टोअरसाठी दरमहा सुमारे ४२लाख रुपये भाडे देणार आहे. या स्टोअरसाठी ॲपलने अंबानीसोबत सुमारे २०,८०० स्क्वेअर फूट जागेसाठी 11 वर्षांचा करार केला आहे.
स्टोअर क्षेत्रासाठी किमान मासिक भाडे सुमारे ४२ लाख रुपये आहे. त्यानंतर दर तीन वर्षांनी भाडे १५ टक्क्यांनी वाढणार आहे. याशिवाय, ॲपलला पहिल्या तीन वर्षांसाठी २ टक्के आणि पहिल्या तीन वर्षानंतर २,५ टक्के महसूल द्यावा लागेल. ॲपलचा मुंबईतील अंबानींच्या मालकीच्या मॉलशी 11 वर्षांचा करार हा त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एक मोठं पाऊल आहे.

टीम कुकनेघेतलीअंबानींची भेट

ॲपल स्टोअर सुरू होण्याच्या एक दिवस आधी सोमवारी टीम कुक मुकेश अंबानींच्या घरी पोहोचले होते. अँटिलियाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते, ज्यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी ॲपलच्या सीईओसोबत दिसत होते.

वााच :Asus ROG Phone 7: जबरदस्त! 16GB पर्यंत RAM, 512GB पर्यंत स्टोरेज असणारा फोन भारतात लॉन्च

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.