ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही त्याबाबत भारतीय समाजात अनेक समज गैरसमज आहेत. प्रामुख्याने गरोदर महिलांना ग्रहणाच्या काळात अधिक सांभाळलं जातं. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. ग्रहणाचा बाळाच्या वाढीवर काही घातक परिणाम होतो. गरोदर महिला ग्रहणात बाहेर पडली तर तिच्या बाळामध्ये दोष निर्माण होतो. ग्रहणामुळे गर्भावर विपरित परिणाम झाल्याची घटना कुठे नोंद नाही परंतु विशेष काळजी घेण्याचं सांगितलं जातं.
या ग्रहणाच्या काळात गरोदर महिला, नवजात बालकं आणि नवमातांची विशेष काळजी घेतली जाते. एकूणच अनेक लोकं ग्रहणाचा काळ हा अशुभ मानतात. त्यावेळेत शुभ कार्य टाळली जातात. सूर्यग्रहण ही अवकाशात घडणारी एक नैसर्गिक स्थिती आहे. त्याचा बाळावर परिणाम होण्याची थेट शक्यता नसते. मात्र काहींच्या मते त्यामुळे गर्भात दोष निर्माण होतात.
एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण; ‘या’ ७ राशीच्या लोकांनी जरा सांभाळून, होईल मानसिक गोंधळ
ग्रहणाच्या काळात महिलांनी घरीच रहावं. या काळात नामस्मरण करावं, बाहेर पडल्यास किंवा कामं केल्यास बाळात दोष निर्माण होतात अशी धारणा आहे.
ग्रहण थेट डोळ्यांनी कोणीच बघू नये. मात्र पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहता येऊ शकतं, सुरक्षेचे उपाय न घेता ग्रहण पाहिल्यास डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. यावर्षीचे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ही विशेष काळजी घेणे आवश्यक नाही. तसेच ग्रहणाच्या काळात सुतक पाळले जाते परंतु ज्या ठिकाणी ग्रहण दिसते त्या ठिकाणी सुतकाच्या नियमांचे पालन केले जाते या वर्षी भारतातून ग्रहण दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळले नाही तरी चालते असे सांगितले जाते.