आयुष्मान योग सकाळी ९ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ७ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-१८,
सूर्यास्त: सायं. ६-५७,
चंद्रोदय: सकाळी ७-४१,
चंद्रास्त: रात्री ९-१२,
पूर्ण भरती: दुपारी १-४० पाण्याची उंची ४.६४ मीटर, उत्तररात्री १-१८ पाण्याची उंची ४.०८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५३ पाण्याची उंची ०.२२ मीटर, सायं. ७-२९ पाण्याची उंची १.५० मीटर.
दिनविशेष: अक्षय्य तृतीया, श्रीबसवेश्वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, रमझान ईद, वसुंधरा दिन.
आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १४ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून १९ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ८ वाजून ५८ मिनिटापर्यंत ते १० वाजून ३५ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग, रवि योग मध्य रात्री ११ वाजून २४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १६ मिनिटापर्यंत. त्रिपुष्कर योग सकाळी ६ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ४९ मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील.
आजचा उपाय : शनी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पण करा आणि शनी चालीसाचे वाचन करा. गहू, गुड,जलाने भरलेला घडा दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)