Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष २२ एप्रिल २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

90

राष्ट्रीय मिती वैशाख २, शक संवत १९४५, वैशाख, शुक्ल द्वितीया, शनिवार, विक्रम संवत २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे ९, शव्वाल-१, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २२ एप्रिल २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. द्वितीया तिथि सकाळी ७ वाजून ४९ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. कृतिका नक्षत्र रात्री ११ वाजून २४ मिनिटापर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ.

आयुष्मान योग सकाळी ९ वाजून २५ मिनिटापर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ७ वाजून ५० मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१८,
सूर्यास्त: सायं. ६-५७,
चंद्रोदय: सकाळी ७-४१,
चंद्रास्त: रात्री ९-१२,
पूर्ण भरती: दुपारी १-४० पाण्याची उंची ४.६४ मीटर, उत्तररात्री १-१८ पाण्याची उंची ४.०८ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५३ पाण्याची उंची ०.२२ मीटर, सायं. ७-२९ पाण्याची उंची १.५० मीटर.

दिनविशेष: अक्षय्य तृतीया, श्रीबसवेश्वर जयंती, श्रीपरशुराम जयंती, रमझान ईद, वसुंधरा दिन.

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटे ते १ वाजून ३ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४४ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १४ मिनिटे ते १२ वाजून ५९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून १९ मिनिटापर्यंत. अमृत काळ रात्री ८ वाजून ५८ मिनिटापर्यंत ते १० वाजून ३५ मिनिटापर्यंत. सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग, रवि योग मध्य रात्री ११ वाजून २४ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १६ मिनिटापर्यंत. त्रिपुष्कर योग सकाळी ६ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ४९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : शनी मंदिरात मोहरीचे तेल आणि काळे तिळ अर्पण करा आणि शनी चालीसाचे वाचन करा. गहू, गुड,जलाने भरलेला घडा दान करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.