वाचा : Jio, Airtel आणि Vi ग्राहकांसाठी फायद्याची बातमी, ‘या’ प्लानमध्ये मिळेल दररोज 4GB पर्यंत डेटा
Android वर स्पॅम मजकूर कसा ब्लॉक करायचा?
- तुमच्या Android फोनवर निरुपयोगी स्पॅम मजकूर संदेश ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम मेसेजिंग अॅपवर जावं लागेल.
- त्यानंतर तुम्हाला ब्लॉक करायचा असलेल्या मेसेजवर जा. त्यानंतर मेसेजच्या वर तीन डॉट्स दिले जातील, त्यावर टॅप करा
- .तिथे तुम्हाला Block पर्याय दिसेल.
- अनेक वेळा हा पर्याय उपलब्ध नसतो. यासाठी तुम्हाला मेसेजवर होल्डकरुन ठेवावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ब्लॉकचा पर्याय दिसेल, तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल.
Android वर स्पॅम मेसेजसची तक्रार कशी कराल?
स्पॅम संदेशांची तक्रार करणं देखील खूप सोपं आहे. ज्या पद्धतीने मेसेज ब्लॉक केले जातात, त्याच पद्धतीने मेसेजची तक्रार करावी लागते. तुम्हाला हा पर्याय ब्लॉकसह मिळेल. Block and Report असा ऑप्शन तुम्हाला यावेळी वापरावा लागेल.
वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब