Facebook वर सुरु आहे लूक हू डेड स्कॅम? ‘या’ लिंकवर क्लिक केल्यास बँक खातं होईल रिकामं

नवी दिल्ली : Look Who Died : तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा ओळखीत्या व्यक्तीकडून आलेला एखादा फेसबुक मेसेज जर संशयास्पद वाटतो? तर तो एक सापळा असू शकतो ज्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. सध्या ऑस्ट्रेलियात ‘लूक हू इज डेड’ (Look Who Died) नावाचा नवा स्कॅम सुरू आहे. विशेष म्हणजे भारतातही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या स्कॅमध्ये एक लिंक तुम्हाला फेसबुकवर येते, ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते आणि त्यानंतर तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं.

या स्कॅममध्ये नेमकं काय होतं?
हॅकर्स तुम्हाला फेसबुकवर तुमचा मित्र किंवा ओळखीचं अकाउंच असल्याचं सांगून मेसेज पाठवतात. त्यावर लिहिलेलं असतं Look who died (पाहा कोण मेलं आह?) जर या मेसेजमधील लिंक तुम्ही ओन केली तर त्याती हॅकर्सच्या सॉफ्टवेअरमुळे हॅकर्सना तुमचे Facebook खाते लॉगिन तपशील मिळतो. हे तपशील वापरून, हॅकर्स वापरकर्त्याच्या खात्यात लॉग इन करतात आणि नंतर त्यांच्या खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळवतात. यासह, केवळ वैयक्तिक तपशीलच नाही, तर तुमचे बँक खाते किंवा आर्थिक माहिती तुमच्या खात्याशी जोडलेली असेल, तर तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते.

वाचा : Smartphone Care : चुकूनही या चुका करू नका, नाहीतर स्मार्टफोन कायमचा होईल खराब

या स्कॅमपासून कसं सावध राहाल?

  • तुम्ही अगदी स्ट्राँग पासवर्ड ठेवला पाहिजे. हा पासवर्ड अगदी युनिक असा पासवर्ड असायला हवा. तसेच, Two Step Verificaton देखील ऑन ठेवा
  • वैयक्तिक तपशील ऑनलाइन शेअर करताना तुम्ही खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • कधीच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणं किंवा अज्ञात सोर्सकडन आलेली फाईल डाउनलोड करणे टाळावे. अशा लिंक्स अत्यंत धोकादायक ठरू शकतात.
  • फोनला कायम लेटेट अपडेट्सनी अपडेटेड ठेवा.

वाचा : Google ने ‘या’ ॲप्सवर घातली बंदी, फोनमध्ये असतील तर लगेचच करा डिली

Source link

Cyber Securityfacebookfacebook scamFBfb scamlook who diedफेसबुकफेसबुक स्कॅम
Comments (0)
Add Comment