ट्वीटरने नवीन IT नियम, 2021 च्या पालनाबाबत आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, त्यांना तक्रार निवारण यंत्रणेद्वारे भारतीय वापरकर्त्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कंपनीने सांगितले की, “या तक्रारींबाबत, कंपनीने रिव्ह्यूव केले आणि तीन खात्यांवर बंदी घातली. उर्वरित अहवाल खाती निलंबित करण्यात आली आहेत.” कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी प्रत्येक तक्रारीकडे लक्ष दिले आणि नंतर सर्व बाबींचा विचार करून खात्यांवर कारवाई केली.
वाचा : iPhone 13 वर भन्नाट ऑफर, थेट ३८,००० वाचवण्याची संधी, पाहा नेमकी ऑफर काय?काय होत्या युजर्सच्या तक्रारी?
Twitter नुसार, भारतीय वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी मुख्यतः गैरवर्तन/छळ (83), संवेदनशील प्रौढ सामग्री (41), द्वेषपूर्ण आचरण (19) आणि बदनामी (12) संबंधित होत्या. एका अहवालानुसार, ट्वrटरने भारतासह जागतिक स्तरावर सामग्रीवर बंदी घालण्याच्या किंवा ब्लॉक करण्याच्या ८३ टक्के सरकारी विनंत्या मंजूर केल्या आहेत.
वाचा : Instagram Security : इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्ती देत आहे त्रास? ही सेटिंग करा आणि लगेचच मिळवा सुटका