या लाइनअपमधील सर्वात परवडणारा लॅपटॉप हा Infinix InBook X2 Slim i3 Edition आहे जो 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. त्याची किंमत २७,९९० रुपये आहे. Infinix InBook X2 Slim ची विक्री Flipkart वर ९ जूनपासून सुरू होईल. कदाचित त्यासोबत काही बँक ऑफर्सही मिळतील. नवीन नोटबुक लाल, हिरवा, सिल्व्हर आणि निळ्या रंगात उपलब्ध आहेत.
Infinix InBook X2 चे फीचर्स
हा लॅपटॉप ३ व्हेरियंटमध्ये येतो. 11th-Gen Intel Core i3, i5, आणि i7 प्रोसेसर असे तीन प्रकार असून लॅपटॉप एकात्मिक GPU सह येतात. त्यामुळे हेवी गेमिंग या लॅपटॉपवर भारीप्रकारे होऊ शकते. लॅपटॉप PCle 3.0 SSD फास्ट-स्टोरेजसह येत असून LPPDR4X RAM सह येतात. कंपनीने सांगितले आहे की त्यांनी यात 1.0 कूलिंग सिस्टम दिली आहे. यात 2 USB 3.0 Type-A पोर्ट, HDMI पोर्ट आणि Type-C पोर्ट आहेत. InBook X2 स्लिम सिरीजला फुल-एचडी रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह IPS डिस्प्ले मिळतो.
InBook X2 स्लिम लॅपटॉपमध्ये 50Wh बॅटरी उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप 11 तास वेब ब्राउझिंग आणि 9 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक देईल. एक 65W अडॅप्टर पॅकेजमध्ये येतो आणि वापरकर्ते ते टाइप-सी पोर्टद्वारे देखील चार्ज करू शकतात. सर्व नवीन लॅपटॉप Windows 11 OS वर काम करतात.
वाचा : Instagram Security : इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्ती देत आहे त्रास? ही सेटिंग करा आणि लगेचच मिळवा सुटका