BSNL ची भन्नाट ऑफर फक्त ३२९ रुपयांमध्ये १००० जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही

नवी दिल्ली :BSNL Broadband Plan : तुम्ही ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत आहात, तर आजही ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सरकारी कंपनी BSNL एक अतिशय स्वस्तात मस्त प्लान घेऊन येत आहे. हा प्लान फक्त ३२९ रुपयांचा आहे. यामध्ये युजर्सना अनेक व्हॅल्यू फॉर मनी बेनिफिट्स मिळत आहेत. हा प्लान जिओ आणि एअरटेलला टक्कर देऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया की BSNL च्या ३२९ रुपयांच्या प्लानमध्ये कोण-कोणते फायदे येत आहेत.

BSNL चा सर्वात स्वस्त प्लान
ही कंपनीची सर्वात किफायतशीर योजना आहे. यामध्ये यूजर्सला दर महिन्याला ३२९ रुपये द्यावे लागतील. यामध्ये 1TB (1000GB) मासिक डेटा दिला जात आहे. यासोबतच यूजर्सना 20 Mbps चा इंटरनेट स्पीड देखील दिलं जाईल. तुमचा मासिक डेटा संपल्यावर, इंटरनेटचा वेग कमी होऊन ४ एमबीपीएस होतो. या प्लानमध्ये यूजर्सना आणखी एक फ्री फायदा मिळत आहे. यामध्ये फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फिक्स्ड लाइनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. यामध्ये यूजर्सना प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

एअरटेल-जिओच्या प्लान्सना तगडी टक्कर
एअरटेलच्या सर्वात किफायतशीर प्लानबद्दल बोलायचं झालं तर, कंपनी यूजर्सला ४९९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. यामध्ये ४० एमबीपीएस इंटरनेट स्पीडसह अमर्यादित डेटा दिला जात आहे. हा डेटा ३३००जीबी पर्यंत उपलब्ध असेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. जिओच्या प्लानबद्दल बोलायचं झालं तर त्याचा प्लान ३९९ रुपयांचा आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. यासोबतच 30 Mbps चा इंटरनेट स्पीड दिला जात आहे. दरम्यान किंमतीच्या बाबतीत तरी बीएसएनएलचा प्लान अगदी स्वस्त आहे.

वाचा : स्वस्तात iPhone घेण्याची संधी, ३२ हजारपेक्षाही कमी किंमत, Amazon वर सुरु आहे ऑफर

Source link

broadband plansBSNLbsnl broadbandbsnl wifiबीएसएनएलबीएसएनएल प्लान्सब्रॉडबँड प्लान्स
Comments (0)
Add Comment