तर JioTag हे पांढर्या रंगाचे डिव्हाईस असून याची किंमत सध्या ७४९ रुपये ठेवली गेली आहे. कंपनी देशभरातील निवडक पिन कोडवर कॅश-ऑन-डिलिव्हरीसह याची विक्री करत आहे, परंतु इतर ठिकाणी प्रीपेड ऑर्डर देऊन हे डिव्हाईस विकत घेता येईल. डिव्हाइससह बॉक्समध्ये अतिरिक्त बॅटरी आणि केबल देण्यात येते.
JioTag चे खास फीचर्स
बदलण्यायोग्य बॅटरीसह JioTag सादर केले गेले आहे. म्हणजेच, तुम्ही त्याची बॅटरी देखील काढू शकता. याला CR2032 बॅटरी मिळते, जी एक वर्षापर्यंत बॅटरी लाईफ देते. ब्लूटूथ ट्रॅकर वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनला ब्लूटूथ v5.1 वापरून कनेक्ट करता येते. आयटम ट्रॅक करण्यासाठी वापरकर्ते ते त्यांच्या वॉलेटमध्ये, हँडबॅगमध्ये किंवा इतर कोणत्याही पर्सनल गोष्टीसह ठेवू शकतात. हे एका खास केबलसह देखील येते, ज्यामुळे ट्रॅकरला इतर वस्तूंशी जोडणे सोपे होते. घरामध्ये २० मीटरपर्यंत आणि घराबाहेर ५० मीटरपर्यंत ट्रॅकिंग रेंज हे डिव्हाईस देते. JioTag चे वजन ९.५ ग्रॅम आहे. नियमित वापराच्या वस्तू शोधण्याव्यतिरिक्त, ट्रॅकरचा वापर वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनला ट्रॅक करण्यासाठीही केला जाऊ शकतो. JioTag वर डबल-टॅप केल्याने फोन सायलेंट मोडमध्ये असतानाही फोन वाजतो. त्यामुळे परवडणाऱ्या किंमतीत बरेच फीचर या डिव्हाईसमध्ये कंपनी देत असल्याने ही एक भारी खरेदी आहे.
वाचा : Amazon India झालं १० वर्षांचं, लाँचिंगवेळी सर्वात आधी विकल्या गेल्या होत्या ‘या’ १० गोष्टी