महाराष्ट्रात शाळा सोडण्याचे प्रमाण घटले; ७ राज्यांतील प्रमाण मात्र सरासरीपेक्षा अधिक, देशभरात काय स्थिती?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण महाराष्ट्रात घटले असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी गळतीचे वार्षिक सरासरी प्रमाण २०२०-२१मध्ये ११.२ टक्के होते. ते २०२१-२२मध्ये १०.७ टक्के झाले आहे. तर, गुजरातसह सात राज्यांतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण सरासरीपेक्षा (१२.६) अधिक असल्याचे या आकडेवारीवरून दिसते.महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत १५ टक्क्यांहून अधिक प्रमाण

– २०२३-२४साठी ‘समग्र शिक्षा’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत आयोजित प्रकल्प मंजुरी मंडळाच्या (पीएबी) बैठकांच्या इतिवृत्तांतातून ही माहिती एकत्रित करण्यात आली आहे.
– यावर्षी मार्च ते मे दरम्यान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत या बैठका झाल्या.
– या माहितीनुसार, महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी गळतीचे प्रमाण १५ टक्के आणि त्याहून अधिक आहे.

१०० टक्के नावनोंदणीचे उद्दिष्ट

-२०३०पर्यंत शालेय स्तरावर १०० टक्के एकूण नावनोंदणी दराचे (जीईआर) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे.
– हे उद्दिष्ट साध्य करण्यात शालेय विद्यार्थ्यांची गळती हा एक मोठा अडसर असल्याचे सरकार मानते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
– युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडच्या (युनिसेफ) गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात असे म्हटले होते की, भारतात ३३ टक्के मुली घरगुती कामांमुळे शाळा सोडतात.
– शाळा सोडल्यानंतर अनेक मुले आपल्या कुटुंबीयांसोबत मजूर म्हणून किंवा लोकांकडे घरकाम करू लागल्याचेही अनेक ठिकाणी आढळून आले.

सरासरीपेक्षा जास्त प्रमाण असलेली राज्ये (२०२१-२२)

– मेघालय : २१.७
– बिहार : २०.४६
– आसाम : २०.३
– गुजरात : १७.८५
– पंजाब : १७.२
– आंध्र प्रदेश : १६.७
– कर्नाटक : १४.६
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १६ जूनपासून पाणी महागणार, पाणीपट्टी इतकी वाढण्याची शक्यता
कोणत्या राज्यात काय स्थिती?

– पश्चिम बंगालमध्ये २०२०-२१ ते २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात, विशेषत: प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
– दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आहे.
– मध्य प्रदेशात २०२०-२१मध्ये २३.८ टक्के असलेले विद्यार्थी गळतीचे प्रमाण २०२१-२२मध्ये १०.१ टक्क्यांनी कमी झाले.
– उत्तर प्रदेशमधील आठ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी गळतीचे वार्षिक सरासरी प्रमाण खूपच जास्त आहे.
– राजस्थानमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे, परंतु अनुसूचित जमाती (नऊ टक्के) आणि मुस्लिम (१८ टक्के) मुलांनी शाळा सोडण्याचे प्रमाण माध्यमिक स्तरावर अजूनही खूप जास्त आहे.

Source link

educational newsHolistic Educationindias education statusStudent dropout rateUnited Nations Childrens Fund
Comments (0)
Add Comment