१,४९९ रुपयांचा जिओ फायबर प्लॅन
रिलायन्स जिओचा 1499 रुपयांचा जिओ फायबर प्लॅन अमर्यादित डेटा ऑफर करतो. या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 300Mbps स्पीडने इंटरनेट दिले जाते. जिओचा हा फायबर प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. रिलायन्स जिओच्या १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये Jio ॲप्सचा मोफत प्रवेश मिळतो. या प्लॅनमध्ये JioCinema, JioSaavn चा प्रवेश देखील समाविष्ट आहे. रिलायन्स जिओ फायबर प्लॅनमध्ये, ग्राहकांना नेटफ्लिक्स बेसिक प्लान , ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात. याशिवाय Disney + Hotstar, Sony Liv, यांसारख्या ॲप्सवर मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.
२,४९९ रुपयांचा जिओ फायबर प्लॅन
जिओ फायबरचा हा प्लान 500Mbps च्या अपलोड आणि डाउनलोड स्पीडसह येतो. यामध्ये अनलमिटेड डेटा मिळणार आहे. तसंच ५५० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल आणि फ्री कॉलिंगचं बेनिफिटही मिळणार आहे.रिलायन्स जिओच्या या फायबर प्लॅनमध्ये, ग्राहकांना नेटफ्लिक्स स्टॅँडर्ड, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात. याशिवाय Disney + Hotstar, Sony Liv, यांसारख्या ॲप्सवर मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहे.
३,९९९ रुपयांचा जिओ फायबर प्लॅन
जिओ फायबरचा हा प्लान एकदम फास्ट असून 1gbps च्या अपलोड आणि डाउनलोड स्पीडसह येतो. यामध्ये देखील अनलमिटेड डेटा मिळणार आहे. तसंच ५५० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल आणि फ्री कॉलिंगचं बेनिफिटही मिळणार आहे.रिलायन्स जिओच्या या फायबर प्लॅनमध्ये, ग्राहकांना ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ सारख्या मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळतात. याशिवाय Disney + Hotstar ॲपच देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळणार असून खास म्हणजे नेटफ्लिक्सचं प्रिमीयम व्हर्जन मिळेल.
वाचा : Meta Verified: आता ६९९ रुपये देऊन इन्स्टाग्रामसह फेसबुकही होणार वेरिफायड, मेटा वेरिफायड भारतात लाँच