आयफोन १५ चे टेन्शन वाढणार
एका रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, नथिंगच्या या फोनमुळे आयफोन १५ सीरीजचे टेन्शन वाढू शकते. कारण, बरोबर आयफोन १५ सीरीजच्या दोन महिन्याआधी नथिंगचा फोन लाँच केला जात आहे. नथिंगकडून अपकमिंग नथिंग फोन २ ची अधिकृत लाँचिंग डेटची घोषणा करण्यात आली आहे. तर आयफोन १५ सीरीजला सप्टेंबर महिन्यात लाँच केले जाऊ शकते. नथिंग फोन २ लवकर मार्केटमध्ये येऊन आयफोनचे टेन्शन वाढवू शकते.
नथिंग फोन (2) लाँचिंग टाइम
नथिंग फोन (2) ला लंडन मध्ये ११ जुलै २०२३ रोजी लाँच केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार म्हणजेच रात्री ८.३० वाजता या फोनची लाँचिंग केली जाणार आहे. तुम्ही या फोनचा लाँचिंग इव्हेंट nothing.tech वेबसाइट पाहू शकता.
वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स
कुठे पाहाल लाइव्ह इव्हेंट
लंडन बेस्ड टेक्नोलॉजी ब्रँड नथिंगने माहिती दिली आहे की, भारतीय ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोनची लाँचिंग nothing.tech वर लाइव्ही केली जाणार आहे.
वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग
मेड इन इंडिया असेल Nothing Phone 2
नथिंगचा हा दुसरा फोन म्हणजेच सेकंड जनरेशन स्मार्टफोन आहे. नवीन स्मार्टफोनवरून वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत.
नथिंग फोन २ मध्ये काय असेल खास
सर्वात आधी नथिंग फोन २ मेड इन इंडिया असेल. नथिंग फोन २ मध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. याचाच अर्थ फोन आधीच्या तुलनेत खूपच पॉवरफुल असणार आहे. तसेच फोनची डिझाइन खूपच यूनिक असेल. या फोनचा डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबत पॉवर बँकसाठी फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
वाचाः पैसे न देता ऑनलाइन बुक करा ओयो, जाणून घ्या डिटेल्स