Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकदाचं ठरलं! ११ जुलै रोजी Nothing Phone (2) स्मार्टफोन लाँच होणार

8

जर तुम्हाला आयफोनला टक्कर देणारा फोन खरेदी करायचा असेल तर लवकरच एक नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये येत आहे. नथिंगचा दुसरा स्मार्टफोन Nothing Phone (2) ११ जुलै रोजी लाँच केला जाणार आहेत. वनप्लस फोनला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये फोन उतरवणाऱ्या नथिंग ब्रँडच्या फाउंडरने आता आयफोनला टक्कर देण्याचे ठरवले आहे. कंपनीने पहिला स्मार्टफोन लाँच केला त्याला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता ११ जुलै रोजी नथिंगचा दुसरा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.

आयफोन १५ चे टेन्शन वाढणार
एका रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, नथिंगच्या या फोनमुळे आयफोन १५ सीरीजचे टेन्शन वाढू शकते. कारण, बरोबर आयफोन १५ सीरीजच्या दोन महिन्याआधी नथिंगचा फोन लाँच केला जात आहे. नथिंगकडून अपकमिंग नथिंग फोन २ ची अधिकृत लाँचिंग डेटची घोषणा करण्यात आली आहे. तर आयफोन १५ सीरीजला सप्टेंबर महिन्यात लाँच केले जाऊ शकते. नथिंग फोन २ लवकर मार्केटमध्ये येऊन आयफोनचे टेन्शन वाढवू शकते.

नथिंग फोन (2) लाँचिंग टाइम
नथिंग फोन (2) ला लंडन मध्ये ११ जुलै २०२३ रोजी लाँच केले जाणार आहे. भारतीय वेळेनुसार म्हणजेच रात्री ८.३० वाजता या फोनची लाँचिंग केली जाणार आहे. तुम्ही या फोनचा लाँचिंग इव्हेंट nothing.tech वेबसाइट पाहू शकता.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

कुठे पाहाल लाइव्ह इव्हेंट
लंडन बेस्ड टेक्नोलॉजी ब्रँड नथिंगने माहिती दिली आहे की, भारतीय ग्राहकांसाठी नवीन स्मार्टफोनची लाँचिंग nothing.tech वर लाइव्ही केली जाणार आहे.

वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग

मेड इन इंडिया असेल Nothing Phone 2
नथिंगचा हा दुसरा फोन म्हणजेच सेकंड जनरेशन स्मार्टफोन आहे. नवीन स्मार्टफोनवरून वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत.

नथिंग फोन २ मध्ये काय असेल खास
सर्वात आधी नथिंग फोन २ मेड इन इंडिया असेल. नथिंग फोन २ मध्ये स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. याचाच अर्थ फोन आधीच्या तुलनेत खूपच पॉवरफुल असणार आहे. तसेच फोनची डिझाइन खूपच यूनिक असेल. या फोनचा डिस्प्ले आधीच्या तुलनेत मोठा असेल. फोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. सोबत पॉवर बँकसाठी फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

वाचाः पैसे न देता ऑनलाइन बुक करा ओयो, जाणून घ्या डिटेल्स

Nothing Phone (2) Launch : आ रहा अनोखे ट्रांस्पेरेंट लुक वाला फोन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.