सध्या मार्केटमध्ये बरेच थर्ड-पार्टी अॅप्स आहेत जे Android आणि iOS मध्ये इनबिल्ट हवामानाच्या माहितीची सेवा देतात. हे अचूक आणि रिअल-टाइम डेटा प्रदान करतात. तुमच्या Android आणि iOS डिव्हाइसेसमध्ये हवामान विजेट जोडून तुम्ही झटपट हवामान अपडेट कसे मिळवू शकता? ते जाणून घेऊ.
आयफोनवर हवामानासंबधी माहिती कशी मिळवायची?
तुमच्याकडे iOS 16 किंवा लेटेस्ट चालणारा iPhone असल्यास, तुमच्या होम स्क्रीनवर हवामान विजेट्स जोडण्यासाठी खाली सोप्या टिप्स वापरु शकता.
- प्रथम होम स्क्रीनवर जा आणि स्क्रीनवर दीर्घकाळ क्लिक करु ठवाल दाबा
- नंतर वरच्या उजव्या कोपर्यात दिलेल्या + (प्लस बटण) चिन्हावर टॅप करा
- यानंतर हवामान म्हणजेच Weather पर्याय शोधा आणि ते तुमच्या होम स्क्रीनवर घ्या.
- आयफोनवरील या हवामान विजेटमध्ये रिअल-टाइम तापमान आणि १० दिवसांचा अंदाज यासारखी बरीच माहिती मिळेल. त्याचप्रमाणे, वापरकर्ते लॉक स्क्रीनवर हवामान विजेट देखील जोडू शकतात.
Android डिव्हाइसवर वेदर अपडेट्स कसे मिळवाल?
Android फोनमध्ये हवामान विजेट जोडण्याचा पर्याय मॉडेलनुसार बदलतो. यात अनेक फोनमध्ये चालणारी प्रक्रिया ही खालीलप्रमाणे आहे.
- प्रथम होम स्क्रीनवर जाऊन लाँग प्रेस करुन ठेवा
- नंतर विजेट्स पर्यायावर क्लिक करा आणि नंतर हवामान शोधा
- होम स्क्रीनवर जोडण्यासाठी यालाही लाँग प्रेस करा.
वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?