Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Biparjoy Cyclone चा धोका, हवामानाशी संबंधित प्रत्येक अपडेट फोनवर, ‘या’ सिंपल स्टेप्स करा फॉलो

10

नवी दिल्ली : Get Weather Udpates on Smartphone : काही दिवसांपासून, बिपरजॉय चक्रीवादळाची खूप चर्चा होत आहे. महाराष्ट्रातही या वादळाचा धोका असून गुजरातमध्येही या वादळाने नुकसान केलं आहे. दरम्यान देशभरात विध्वंस घालणाऱ्या या चक्रीवादळाला धोकादायक घोषित करण्यात आले असून देशाच्या काही भागांतील किनारी भागात राहणाऱ्या लोकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान अशा या परिस्थितीत जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर हवामानाशी संबंधित माहिती हवी असेल, तर तुम्ही काही सिंपल स्टेप्सने ही माहिती मिळवू शकता आणि हवामानासंबधी कोणत्याही धोक्याची माहिती आधीच जाणून घेऊन तयार राहू शकता. तर जर तुम्हाला तुमच्या होम स्क्रीनवर वेदर अपडेट्स हवे असतील तर ते जाणून घेऊ….

सध्या मार्केटमध्ये बरेच थर्ड-पार्टी अॅप्स आहेत जे Android आणि iOS मध्ये इनबिल्ट हवामानाच्या माहितीची सेवा देतात. हे अचूक आणि रिअल-टाइम डेटा प्रदान करतात. तुमच्या Android आणि iOS डिव्हाइसेसमध्ये हवामान विजेट जोडून तुम्ही झटपट हवामान अपडेट कसे मिळवू शकता? ते जाणून घेऊ.

आयफोनवर हवामानासंबधी माहिती कशी मिळवायची?
तुमच्याकडे iOS 16 किंवा लेटेस्ट चालणारा iPhone असल्यास, तुमच्या होम स्क्रीनवर हवामान विजेट्स जोडण्यासाठी खाली सोप्या टिप्स वापरु शकता.

  • प्रथम होम स्क्रीनवर जा आणि स्क्रीनवर दीर्घकाळ क्लिक करु ठवाल दाबा
  • नंतर वरच्या उजव्या कोपर्यात दिलेल्या + (प्लस बटण) चिन्हावर टॅप करा
  • यानंतर हवामान म्हणजेच Weather पर्याय शोधा आणि ते तुमच्या होम स्क्रीनवर घ्या.
  • आयफोनवरील या हवामान विजेटमध्ये रिअल-टाइम तापमान आणि १० दिवसांचा अंदाज यासारखी बरीच माहिती मिळेल. त्याचप्रमाणे, वापरकर्ते लॉक स्क्रीनवर हवामान विजेट देखील जोडू शकतात.

Android डिव्हाइसवर वेदर अपडेट्स कसे मिळवाल?
Android फोनमध्ये हवामान विजेट जोडण्याचा पर्याय मॉडेलनुसार बदलतो. यात अनेक फोनमध्ये चालणारी प्रक्रिया ही खालीलप्रमाणे आहे.

  • प्रथम होम स्क्रीनवर जाऊन लाँग प्रेस करुन ठेवा
  • नंतर विजेट्स पर्यायावर क्लिक करा आणि नंतर हवामान शोधा
  • होम स्क्रीनवर जोडण्यासाठी यालाही लाँग प्रेस करा.

वाचा : जर प्राणी माणसांसारखे दिसले असते तर? AI नं तयार केलेले हे ‘विचित्र’ फोटो पाहिले का?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.