बंपर अॅडव्हान्स बुकिंगमुळे ‘आदिपुरुष’ने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग केली होती. यानंतर चित्रपटाच्या व्हीएफएक्स आणि संवादांवर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर टीका होत आहे. तर दुसरीकडे निर्मात्यांनी देखील निवेदन जारी करत म्हटले की त्यांचा महाकाव्य रामायणावर गाढ विश्वास आहे. कुठूनही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नसून, ते केवळ काळाला अनुसरून कथा सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
आदिपुरुष सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
‘आदिपुरुष’चे बजेट ५००० कोटी रुपये आहे. सिनेमा रीलिज झाल्याच्या दिवसापासून पहिल्या वीकेंडपर्यंत या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगचा फायदा झाला आहे. रिलीजपूर्वीच वीकेंडपर्यंत या चित्रपटाची सुमारे १० लाख तिकिटे विकली गेली होती. अशा परिस्थितीत शुक्रवारी, १६ जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळू लागल्यावर त्याचा परिणाम तिकीटविक्रीवरही दिसला. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ ने पहिल्या तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर २१६ कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. त्यापैकी ११२.१९ कोटी रुपयांचा व्यवसाय फक्त हिंदी व्हर्जनचा आहे.
तेलुगू व्हर्जनमध्ये सिनेमाने किती कमावले?
सिनेमाच्या हिंदी व्हर्जनमध्ये ‘आदिपुरुष’ने शुक्रवारी पहिल्या दिवशी ३७.२५ कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी ही कमाई ३७ कोटी रुपये होती, तर रविवारी ३७.९४ कोटी रुपये कमावता आहे. अर्थात टीका होऊनही, आगाऊ बुकिंगमुळे चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये सरासरी ३७ कोटींचे कलेक्शन कायम ठेवले आहे. मात्र तेलगूमध्ये चित्रपटाचे मोठे नुकसान झाले. प्रभासच्या फॅन फॉलोइंगमुळे, चित्रपटाने शुक्रवारी तेलुगू व्हर्जनमध्ये ४८ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र शनिवारी ही कमाई थेट २६.६५ कोटी रुपयांवर घसरली आणि आता रविवारी २४.७१ कोटी रुपयांची कमाई झाली.