आजचे पंचांग आणि दिनविशेष २० जून २०२३ : रथयात्रा, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ ३०, शक संवत १९४५, आषाढ, शुक्ल द्वितीय, मंगळवार, विक्रम संवत २०८०, सौर आषाढ मास प्रविष्टे ६, जिल्हिजा १, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख २० जून २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. द्वितीया तिथी दुपारी १ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र रात्री १० वाजून ३७ मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ.

ध्रुव योग अर्धरात्रौ १ वाजून ४७ मिनिटापर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ. कौलव करण दुपारी १ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दुपारी ३ वाजून ५८ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०३,
सूर्यास्त: सायं. ७-१७,
चंद्रोदय: सकाळी ७-३७,
चंद्रास्त: रात्री ९-२२,
पूर्ण भरती: दुपारी १-४३ पाण्याची उंची ४.२८ मीटर, उत्तररात्री: १-१९ पाण्याची उंची ३.६५ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३५ पाण्याची उंची ०.८० मीटर, साय. ७-४६ पाण्याची उंची १.९० मीटर.

दिनविशेष: रथयात्रा.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १ वाजून ७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५३ मिनिटे ते ३ वाजून ४६ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून १९ मिनिटे ते १ वाजून २ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १७ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंत. अमृत काळ सायं ७ वाजून ५८ ते ९ वाजून ४४ मिनिटापर्यंत राहील. त्रिपुष्कर योग सकाळी ६ वाजून २ मिनिटापर्यंत ते दुपारी १ वाजून ७ मिनिटापर्यंत. रवी योग रात्री १० वाजून ३७ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी ३ वाजेपासून ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ४१ मिनिटे ते ९ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील. यानंतर मध्य रात्री ११ वाजून ३६ मिनिटे ते १२ वाजून १९ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : चमेली तेलात शेंदूर मिसळून हनुमानाला लावा आणि गंध लावा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathiRath Yatrashubh muhurta and shubh yogtoday panchang 20 june 2023आजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२दिनविशेषपंचांगरथयात्राशुभ मुहूर्त आणि शुभ योग
Comments (0)
Add Comment