चित्रपटांच्या कमाईची आकडेवारी सांगणाऱ्या Sacnilk या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, Adipurush ने पहिल्या तीन दिवसात २२१.१ कोटींची कमाई केली, आता चौथ्या दिवसाचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. संध्याकाळपर्यंत हा आकडा काहीसा वाढू शकतो. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच सोमवारी चित्रपटाने सर्व भाषांमध्ये एकूण मिळून फक्त २० कोटींची कमाई केली आहे. यापैकी हिंदीची कमाई १० कोटी आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने या कमाईत झालेल्या घसरणीकडे दुर्लक्ष करता येऊ शकते, मात्र या एकूण आकडेवारी पाहिल्यास खूपच वेगाने सिनेमाची कमाई घसरते आहे.
चौथ्या दिवशी ‘आदिपुरुष’च्या हिंदी व्हर्जनची कमाई १८ कोटींनी घटली
५०० कोटींहून अधिकचे बजेट असणाऱ्या या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या तीन दिवसात दररोज साधारण ३७ ते ३८ कोटी रुपये कमावले होते. अर्थात पहिल्या तीन दिवसात फारशी घसरण झाली नाही, मात्र चौथ्या दिवशी अचानक मोठी तफावत दिसून आली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने ३८ कोटींची कमाई केली होती, या कमाईत चौथ्या दिवशी २८ कोटींची घट झाली. चौथ्या दिवशी या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने केवळ १० कोटी कमावले आहेत. या कमाईनंतर चार दिवसांत या सिनेमाची कमाई २४१ कोटी झाली आहे. Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने तीन दिवसात सुमारे ३०२ कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.
तेलुगूमध्ये ‘आदिपुरुष’ची कमाई घसरली
केवळ हिंदीतच नाही, तर सर्व भाषांमधील कमाईत घसरण वेगाने झाली आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदीत ३७.२५ कोटी रुपयांची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी ३८ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी ३८ कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी १० कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तेलगू भाषेत तर चित्रपटाच्या कमाईमध्ये ही घसरण ही घसरण दुसऱ्या दिवसापासून नोंदवली जाते. प्रभासचा मोठा चाहतावर्ग असूनही ही घसरण पाहायला मिळाली. तेलगूमध्ये ‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी हिंदीपेक्षा जास्त कमाई अर्थात ४८ कोटी रुपये कमावले होते. मात्र दुसऱ्या दिवशी हा आकडा थेट २६.६५ कोटींवर घसरला. वीकेंडला रविवारी त्यात थोडी वाढ झाली आणि ती कमाई २९.३ कोटींच्या जवळ पोहोचली होती.