३०९९ रुपयांचा प्लान
हा कंपनीचा ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान आहे. ज्यामध्ये युजर्सना दररोजसाठी २ जीबी डेटा कंपनी देत आहे. तसंच विशेष म्हणजे कंपनी ५० जीबी अधिकचा डेटा युजर्सना याद्वारे देत आहे. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दरदिवसाला १०० मोफत एसएमएस मिळत आहेत.तसंच वोडाफोन-आयडियाचा बिंज ऑल नाईट बेनिफिटही आहेत. ज्यामुळे रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड इंटरनेट मिळणार आहे. अधिकचा फायदा म्हणाल तर डिज्नी प्लस हॉटस्टारचचं मोफत सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी या प्लानमध्ये आहे. Vi Movies & TV अॅपचं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे.
वाचा : Smartphone Camera Care : मोबाईलचा कॅमेरा साफ करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर कॅमेराच होईल खराब
१४४९ रुपयांचा प्लान
हा कंपनीचा प्लान १८० दिवसांच्या वैधतेसह येत आहे. यामध्ये तुम्हाला १.५ जीबी डेली डेटा मिळत आहे. ऑफरमध्ये कंपनी ३० जीबी अधिकचा डेटा ही मिळणार आहे. तसंच अनलिमिटेड कॉलिंग आणि दरदिवसाला १०० मोफत एसएमएस मिळत आहेत. याशिवाय Vi Movies & TV अॅपचं सब्सक्रिप्शनही मिळणार आहे. तसंच वोडाफोन-आयडियाचा बिंज ऑल नाईट बेनिफिटही आहेत.
वाचा : समोरचा आपला कॉल रेकॉर्ड करतोय का? जाणून घेण्यासाठी ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो?