Xiaomi Pad 6 च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत २६,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेल २८,९९९ रुपयांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. दरम्यान लाँच ऑफरचा एक भाग म्हणून, Xiaomi ICICI बँक क्रेडिट कार्ड व्यवहारांद्वारे टॅब्लेटच्या खरेदीवर तब्बल ३ हजारांची सूट देत आहे. तसच लाँच ऑफर अंतर्गत, एक्सचेंजमध्येही ३ हजार रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. अशारितीने ६ हजारापर्यंत थेट सूट मिळवता येऊ शकते. तर या Xiaomi Pad 6 सोबत Xiaomi Pad 6 Keyboard Case ४,९९९ रुपयांमध्ये घेता येईल. तसंच टॅबलेटसाठी फोलिओ केस १,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. आजपासून हा टॅब Mi Store आणि Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध असेल.
Xiaomi Pad 6 चे फीचर्स
Xiaomi Pad 6 मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 650 GPU उपलब्ध आहे. यामध्ये ६ जीबी आणि ८ जीबी रॅमसह १२८ आणि २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्यायही आहेत. Xiaomi च्या या टॅबलेटमध्ये Android 13 आधारित MIUI 14 उपलब्ध आहे. Xiaomi Pad 6 मध्ये ११ इंचाचा डिस्प्ले आहे जो 2880 × 1800 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. Xiaomi Pad 6 चा रिफ्रेश रेट 144 Hz आहे. यात १३ मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी, 8840mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
वाचा : आता CT Scan, MRI, Xray करायची गरज नाही, फक्त डोळे स्कॅन करुन कळणार तुम्हाला कोणता आजार?