Vaccination In Maharashtra: महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत!; ही विक्रमी कामगिरी करणारं दुसरं राज्य

हायलाइट्स:

  • महाराष्ट्राने लसीकरणात गाठलं नवं शिखर.
  • आतापर्यंत पाच कोटी नागरिकांना दिली लस.
  • उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी.

मुंबई: करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. ( Vaccination In Maharashtra Latest Update )

वाचा:करोना: मुंबईकरांना मोठा दिलासा; पाहा, मुंबई ठाण्यात अशी आहे ताजी स्थिती!

राज्यात १४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. सोमवारी झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वाचा:मॉलमध्ये लहान मुलांना असा मिळणार प्रवेश!; राज्य सरकारचा सुधारित आदेश

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कामगिरीसाठी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सोमवारी ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यासोबतच राज्यात एकूण डोसेसच्या संख्येने ५ कोटींचा टप्पा पार केला असून उत्तर प्रदेश पाठोपाठ देशात महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेचे विशेष कौतुक आहे, असे राजेश टोपे यांनी नमूद केले.

वाचा: धक्कादायक: प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीने लॉजवर बोलवून केले ‘हे’ भयंकर कृत्य

दरम्यान, कोविड लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली आहे. लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यांत राज्याचा सातत्याने पहिला क्रमांक राहिला आहे. पुरेसा लसपुरवठा न झाल्याने अनेकदा मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत लसीकरण थांबवावे लागले आहे. या स्थितीतही राज्याने पाच कोटी नागरिकांना आतापर्यंत लस देऊन लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला आहे.

वाचा:महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊनची शक्यता आहे का? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं थेट उत्तर

Source link

covid vaccination in maharashtravaccination in maharashtravaccination in maharashtra latest newsvaccination in maharashtra latest updatevaccination in maharashtra updatesकरोना प्रतिबंधात्मक लसीकरणकोविडडॉ. प्रदीप व्यासमुंबईराजेश टोपे
Comments (0)
Add Comment