नवी दिल्लीतील, द लीलामद्ये नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात या मत्त्वपूर्ण पुरसकारांचे वितरण करण्यात आले. देशाचे केंद्रीय मंत्री श्री. महेंद्र नाथ पांडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
BW Legal World द्वारे बेनेट युनिव्हर्सिटीची भारतातील सर्वोच्च कायदा विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली असून, सर्वोत्कृष्ट विधि आणि कायदेशीर शिक्षण देणाऱ्या विद्यापीठ म्हणून गौरव केला आहे.
( वाचा : Indian Army : सैन्यदलाद्वारे तांत्रिक आणि विधी विभागासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात )
शिवाय, झी डिजिटलद्वारे ‘एड्युफ्युचर एक्सलन्स अवॉर्ड सीझन ३’ मध्ये बेनेट युनिव्हर्सिटीला प्रदान करण्यात आलेला ‘बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन इंजिनीअरिंग कॉलेज’ हा पुरस्कार संस्थेच्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे. आधुनिक पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विद्यापीठाचा भर विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यास सक्षम करतो आणि त्यांना त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यास तयार करतो ही एक कौतुकाची बाब आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील नवकल्पना आणि संशोधनात आघाडीवर राहण्याच्या दृष्टीकोनातून, बेनेट विद्यापीठाने विविध विषयांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती करणे सुरू ठेवले आहे. भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांच्या यादीत आता विद्यापीठाला बेनेट विद्यापीठालाही महत्त्वाचे आणि सर्वोच्च स्थान मिळाले आहे.
( वाचा : FE 2023 Admission : प्रथम वर्षीय इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. )