‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्या १२ दिवसात तब्बल २७८ कोटींचा गल्ला जमवला. यापैकी सर्वाधिक कमाई केवळ पहिल्या २ दिवसांची आहे. मात्र त्यानंतर आदिपुरुषच्या कमाईचा वेग मंदावला आणि चित्रपट फ्लॉपच्या यादीत येऊन बसला. दुसरीकडे मराठी चित्रपटांनी आपली घौडदौड सुरूच ठेवली.
रावरंभा
‘रावरंभा’ या चित्रपटाने तीन आठवड्यात तब्बल ६ कोटी २५ लाखांचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट मोठया चित्रपटगृहांमधून उतरला असला तरी तो टुरिंग टॉल्किजवार सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
चौक
दुसरीकडे ‘चौक’ या राजकारणावर आधारलेल्या चित्रपटाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांना चौकातील परिस्थिती दाखवली. या चित्रपटाने नुकताच चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४ कोटी ५५ लाखांची कमाई केली आहे.
टीडीएम
तर भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘टीडीएम’ बद्दल सांगायचं तर या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही अनेक ठिकाणी ‘टीडीएम’ आपली जादू चालवतोय. या चित्रपटाने खासकरून ग्रामीण भागातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाने एकूण ३ कोटींहुन जास्तीची कमाई केली असल्याचं एका वेबसाइटने म्हटलं आहे.
यावरून ‘आदिपुरुष’ कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असली तरी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली असल्याचं चित्र आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित होत आहे.