‘पॉवरग्रिड कॉर्पोरेषन ऑफ इंडिया’मध्ये तब्बल १०३५ जागांसाठी महाभरती; आत्ताच करा अर्ज

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1035 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Power Grid Corporation of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1035 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पद तपशील आणि पद संख्या

एकूण : १ हजार ३५ जागा
01. इलेक्ट्रिशियन : १६१
02. सेक्रेटरिअर असिस्टंट : ०३
03. डिप्लोमा अप्रेंटिस : ३३५
04. पदवीधर अप्रेंटिस : ४०९
05. एचआर एक्सिक्युटिव्ह : ९४
06. सीएसआर एक्सिक्युटिव्ह : १६
07. एक्झिक्युटिव ( विधी ) : ०७
08. पीआर सहाय्यक : १०

वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे संबंधित शाखांमधील अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रातून डिप्लोमा / पदवी आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमदेवाराचे किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क :

  • PGCIL जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे इच्छुक आणि पात्र उमदेवारांनी आपला अर्ज PGCIL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सादर करायचा आहे.
  • अर्जदारांना ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे.
  • सदर पदभरती प्रक्रियेस अर्ज सादर करण्यास कोणतेही आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

आवश्यक कागदपत्रं :

अर्ज भरताना उमेदवारांना खालील कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तयार ठेवावी

  1. छायाचित्र (५० KB पर्यंत) jpg स्वरूपात.
  2. स्वाक्षरी (३० KB पर्यंत) jpg स्वरूपात.
  3. दहावीचे प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात.
  4. दहावी मार्कशीट (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात आणि बारावीचे प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात.
  5. बारावी मार्कशीट (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात.
  6. पदवी/डिप्लोमा/ITI प्रमाणपत्र (अंतिम/तात्पुरती) (१ MB पर्यंत pdf स्वरूपात.
  7. पदवी/डिप्लोमा/ITI मार्कशीट (१० MB पर्यंत) pdf स्वरूपात.
  8. जात प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात (लागू असल्यास).
  9. PwD प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात (लागू असल्यास).
  10. इतर प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात (लागू असल्यास).

Source link

Jobjob openingsPGCIL Recruitment 2023PGCLsarkari naukri
Comments (0)
Add Comment