Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पद तपशील आणि पद संख्या
एकूण : १ हजार ३५ जागा
01. इलेक्ट्रिशियन : १६१
02. सेक्रेटरिअर असिस्टंट : ०३
03. डिप्लोमा अप्रेंटिस : ३३५
04. पदवीधर अप्रेंटिस : ४०९
05. एचआर एक्सिक्युटिव्ह : ९४
06. सीएसआर एक्सिक्युटिव्ह : १६
07. एक्झिक्युटिव ( विधी ) : ०७
08. पीआर सहाय्यक : १०
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे संबंधित शाखांमधील अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रातून डिप्लोमा / पदवी आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमदेवाराचे किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रक्रिया आणि शुल्क :
- PGCIL जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे इच्छुक आणि पात्र उमदेवारांनी आपला अर्ज PGCIL च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सादर करायचा आहे.
- अर्जदारांना ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे.
- सदर पदभरती प्रक्रियेस अर्ज सादर करण्यास कोणतेही आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रं :
अर्ज भरताना उमेदवारांना खालील कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तयार ठेवावी
- छायाचित्र (५० KB पर्यंत) jpg स्वरूपात.
- स्वाक्षरी (३० KB पर्यंत) jpg स्वरूपात.
- दहावीचे प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात.
- दहावी मार्कशीट (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात आणि बारावीचे प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात.
- बारावी मार्कशीट (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात.
- पदवी/डिप्लोमा/ITI प्रमाणपत्र (अंतिम/तात्पुरती) (१ MB पर्यंत pdf स्वरूपात.
- पदवी/डिप्लोमा/ITI मार्कशीट (१० MB पर्यंत) pdf स्वरूपात.
- जात प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात (लागू असल्यास).
- PwD प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात (लागू असल्यास).
- इतर प्रमाणपत्र (१ MB पर्यंत) pdf स्वरूपात (लागू असल्यास).