महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे ५६ रिक्त पदांसाठी भरती

MPBC Mumbai Recruitment: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ [Maharashtra Pollution Control Board] मुंबई, येथे विविध पदांच्या तब्बल ५६ जागांसाठी भरतीची सुरुवात झाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २१ जुलै २०२३ पर्यंत या जागांवर काम करण्याची संधी मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागांतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो, सीनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट्स अशा विविध पदांसाठी ही पदभरती असणार आहे.

विविध पदांचा तपशील आणि रिक्त पद संख्या :

एकूण पद संख्या : ५६ रिक्त पद

  • कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow – JRF) : २९ पद
  • वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow – SRF) : १७ पद
  • संशोधन सहयोगी (Research Associate- RA) : १० पद

(वाचा : भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज; मुंबईमध्ये तयार आहे देशातील पहिलीवहिली AI University)

अर्जदारांची शैक्षणिक पात्रता :

० केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर
उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे

० केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोबायोलॉजी, जीवन विज्ञान, पर्यावरण या विषयातील पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षे रिसर्च
उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे

० पीएच.डी. (केमिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन, जीवन विज्ञान, पर्यावरण) आणि ३ वर्षे रिसर्च
उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षे

(वाचा : ISRO Recruitment 2023: इस्रोमध्ये वैज्ञानिक व अभियंता पदासाठी भरती; तब्बल ६१ जागांसाठी अर्ज करण्याची संधी)

असा करा अर्ज :

  • महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज सादर करण्यासाठी Apply Here वर क्लिक करा.
  • त्यानंतर, तुम्हाला JRF, SRF, RA दिसतील.
  • त्यापैकी तुम्ही ज्या पदाकरिता अर्ज सादर करू इच्छित असला (JRF, SRF, RA
  • तुम्हाला, आवश्यक त्या पदासंबंधित आवश्यक माहिती दिसेल.
  • स्क्रिनवर दिसणारी माहिती काळजीपूर्वक वाचून रजिष्ट्रेशनला सुरुवात करा.
  • तुमचे पूर्ण नाव आणि जन्म दिनांक निवडून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • लॉग इन करून अर्ज पूर्ण करा.

(वाचा : NExT Exam Updates: National Exit Test थेट पुढच्या वर्षी; केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी केली घोषणा)

Source link

Junior Research Fellow - JRFmaharashtra pollution control boardMPBCMPBC Mumbai Recruitmentmumbaipollutionpollution controlpollution control boardResearch Associate- RASenior Research Fellow - SRF
Comments (0)
Add Comment