आजचे पंचांग आणि दिनविशेष १७ जुलै २०२३ : दीपपूजा, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिती आषाढ, २६ शक संवत १९४५ आषाढ कृष्ण, अमावस्या, सोमवार, विक्रम संवत २०८०, सौर श्रावण मास प्रविष्टे २, जिल्हिजा २८, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १७ जुलै २०२३. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋतु.

राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. अमावस्या तिथी अर्धरात्रौ १२ वाजून २ मिनिटापर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. पुनर्वसु नक्षत्र दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ११ मिनिटापर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. व्याघात योग सकाळी ८ वाजून ५७ मिनिटापर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. चतुष्पद करण सकाळी ११ वाजून ६ मिनिटापर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ. चंद्र रात्री १० वाजून ३२ मिनिटापर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-११,
सूर्यास्त: सायं. ७-१८,
चंद्रोदय: पहाटे ५-३१,
चंद्रास्त: सायं. ७-१८,
पूर्ण भरती: दुपारी १२-१६ पाण्याची उंची ४.२१ मीटर, रात्री ११-५९ पाण्याची उंची ३.५५ मीटर,
पूर्ण ओहोटी :पहाटे ५-२२ पाण्याची उंची ०.८८ मीटर, सायं. ६-२२ पाण्याची उंची १.९० मीटर.

दिनविशेष: दर्श- सोमवती अमावास्या, दीपपूजा.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ५३ मिनिटापर्यंत. अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिचे ते ३ वाजून ४० मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ७ मिनिटे ते १२ वाजून ४८ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १९ मिनिटे ते ७ वाजून ४० मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून १ मिनिटे ते १० वाजून ४४ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते सकाळी ९ वाजेपर्यंत. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. सकाळी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ १२ वाजून ५५ मिनिटे ते १ वाजून ५० मिनिटापर्यंत राहील. यानंतर ३ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून ३५ मिनिटापर्यंत.

आजचा उपाय : आज भगवान शंकराला खीर नैवेद्य म्हणून दाखवा. तसेच गरीबाला दूध दान करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

daily astrologypanchang in marathishubh muhurta and shubh yogtoday panchang 17 july 2023आजचे पंचांगआजचे पंचांग आणि दिनविशेष २४ डिसेंबर २०२२
Comments (0)
Add Comment