यूपीएससीच्या विविध पदांसाठी ७१ जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

UPSC Recruitment 2023: केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) विविध पदांच्या तब्ब्ल ७१ जागांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून, सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २७ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या जागांसाठीची भरती प्रक्रिया ऑनलाइन सुरु आहे. त्यामुळे, अर्ज प्रक्रियेच्या या शेवटच्या पाच दिवसांत केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

पद भरतीचा तपशील :

एकूण रिक्त पदे : ७१

विधी अधिकारी (Legal Officer) : २ पद
वैज्ञानिक अधिकारी (Scientist Officer) : १ पद
उप वास्तुविशारद (Deputy Architect) : ५३ पद
वैज्ञानिक ब (Scientist B ) : ७ पद
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (Junior Scientific Officer) : २ पद
सहायक खान सुरक्षा अधिकारी (Assistant Mine Security officer) : २ पद
महासंचालक (Director General) : १ पद
प्रशासनिय अधिकारी (Administrative Officer) : ३ पद

(वाचा : ESIC Mumbai Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतींच्या फेरीतून होणार निवड)

पात्रता आणि वेतन तपशील :

कमाल वय – ३० ते ३५ वर्षे (पोस्टनुसार)

० विधी अधिकारी : ५६,१००- १,७७, ५००
० वैज्ञानिक अधिकारी (केमिकल) : वेतनश्रेणी – ८
० उप वास्तुविशारद : ५६,१००- १,७७, ५००
० शास्त्रज्ञ ‘बी’ (बॅलिस्टिक्स) : ५६,१००- १,७७, ५००
० वैज्ञानिक ‘बी’ (दस्तऐवज) : ५६,१००- १,७७, ५००
० कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विज्ञान) : ४४,९००- १४१४००
० सहाय्यक खाण सुरक्षा अधिकारी (व्यावसायिक आरोग्य) ग्रेड : ६७,७००-२,०८,७००
० महासंचालक : २,२५,०००
० प्रशासकीय अधिकारी : ४४,९००- १४२४००

शैक्षणिक पात्रता :

  1. विधी अधिकारी (लिगल ऑफिसर) : उमेदवाराकडे LLB (कायद्याची पदवी) ३ वर्षांचा अनुभव असावा.
  2. वैज्ञानिक अधिकारी (साइंटिस्ट ऑफिसर) : उमेदवाराकडे M.Sc. हे M.E./M.Tech. आणि १ वर्षाचा अनुभव
  3. उप वास्तुविशारद(डेप्युटी आर्किटेक्ट) : उमेदवाराकडे आर्किटेक्चरमधील पदवी (B.Arch)असावी
  4. वैज्ञानिक ब’ (साइंटिस्ट बी) : उमेदवाराकडे३ वर्षांचा अनुभव तत्सम विषयात पदव्युत्तर पदवी असावी.
  5. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी( ज्युनिअर साइंटिफिक ऑफिसर) (विषय विज्ञान) : उमेदवाराकडे ३ वर्षांच्या अनुभवासह त्याच विषयातील पदव्युत्तर पदवी असावी
  6. सहायक खान सुरक्षा अधिकारी (असिस्टंट माइन सेफ्टी ऑफिसर) : उमेदवाराकडे २ किंवा ३ वर्षांच्या अनुभवासह सर्वोत्तम विषयातील पदव्युत्तर पदवी असावी
  7. महासंचालक (डायरेक्टर जनरल) : उमेदवाराकडे सामान्य कामाच्या अनुभवासह M.Sc पदवी असावी.
  8. प्रशासनिय अधिकारी( अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) : उमेदवाराकडे संबंधित वर्गातील प्रमाणपत्र किंवा मेरीटाइम ऑपरेशन्स अँड मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा मॅरिटाइम अफेअर्समध्ये एमएससी पदवी असावी

(वाचा : IIT Mumbai Recruitment: आयआयटी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत)

अर्ज शुल्काविषयी :

  • सामान्य (General) / ओबीसी (OBC) : २५ रुपये
  • एससी (SC) / एसटी (ST) / पीडब्ल्यूडी (PWD) / सर्व महिला उमेदवार : कोणतेही शुल्क नाही.
  • शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही बँकेत किंवा नेट बँकिंग सेवेचा उपयोग करता येईल.
  • जे उमेदवार महिला आहेत त्यांना अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
  • पुरुष/जनरल ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना, शुल्कात कोणत्याही प्रकारची सूट नाही. अधिक माहितीसाठी अधिकृतपणे वेबसाइटला भेट द्या.

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची शेवटची तारीख :२७ जुलै २०२३

मूळ जाहीरात पाहा.

Source link

GovernmentGovernment jobsarkari naukriUnion Public Service Commissionupscupsc recruitmentUPSC Recruitment 2023upsc.gov.in
Comments (0)
Add Comment