पुणे जिल्हा परिषदेतील एक हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Pune ZP Recruitment 2023: गेल्या चार वर्षांपासून बहुचर्चेत असणाऱ्या पुणे जिल्हा परिषद (PuneZP) भरतीप्रक्रियेची अखेर घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेत गट-क संवर्गातील विविध २१ पदांच्या १००० जागांसाठी भरतीप्रक्रियेला सुरुवात झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या जागांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया पार जाहीर करण्यात आली होती. मात्र ही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वातावरण पाहायला मिळाले. आता पुन्हा भरतीप्रक्रिया सुरू होत असल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण २१ जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत एक हजार जागांसाठी होणार आहे.

(वाचा : Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती, अर्ज कसा करावा)

पदभरती प्रक्रिया ‘आयबीपीएस’ संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या या भरतीप्रक्रियेबाबतची अधिक माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार असून, त्यानंतर मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करता येणार नाही. असे अर्ज केलेल्या उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेतून बाहेर केले जाणार आहे. मात्र वेगवेगळ्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची मुभा आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. तसेच संबंधित उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

(वाचा : HAL Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर, ही संधी खास तुमच्यासाठी; लगेच करा अर्ज)

Source link

Government jobgovernment jobsibpsonline applicationsonline formsPune ZPPune ZP RecruitmentPune ZP Recruitment 2023
Comments (0)
Add Comment