Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यापूर्वी २०१९ मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया पार जाहीर करण्यात आली होती. मात्र ही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी वातावरण पाहायला मिळाले. आता पुन्हा भरतीप्रक्रिया सुरू होत असल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण २१ जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत एक हजार जागांसाठी होणार आहे.
(वाचा : Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती, अर्ज कसा करावा)
पदभरती प्रक्रिया ‘आयबीपीएस’ संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या या भरतीप्रक्रियेबाबतची अधिक माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार असून, त्यानंतर मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करता येणार नाही. असे अर्ज केलेल्या उमेदवारांना थेट निवड प्रक्रियेतून बाहेर केले जाणार आहे. मात्र वेगवेगळ्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची मुभा आहे.
यापूर्वी २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी ६० हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. तसेच संबंधित उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.
(वाचा : HAL Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? तर, ही संधी खास तुमच्यासाठी; लगेच करा अर्ज)