Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

24GB रॅम, एअरोस्पेस ग्रेड 3D कूलिंग, दमदार फिचर्ससह OnePlus Ace 2 होणार लाँच

8

नवी दिल्ली : OnePlus ने आपल्या OnePlus Ace 2 स्मार्टफोनच्या लाँचिंगबद्दल खास घोषणा केली आहे. हा फोन चीनमध्ये ऑगस्टमध्ये लाँच होईल आणि एरोस्पेस ग्रेड 3D कूलिंगसह जगातील पहिला स्मार्टफोन असेल. विशेष म्हणजे फोनच्या रॅम वेरिएंटसह, 16 जीबी आणि 24 जीबी स्टोरेज प्रकार देखील असणार असून मार्केटमध्ये 24 जीबी वेरियंट असलेला हा एक दमदार फोन असेल अशी चर्चा सर्वत्र होत आहे.याशिवाय फोनमध्ये ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले, 1TB microSD कार्ड सपोर्ट, 5500mAh बॅटरी, 150W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सर आणि 50MP मुख्य कॅमेरा सेन्सर यांचा समावेश असेल.

OnePlus कडून OnePlus Ace 2 स्मार्टफोनच्या अधिकृत लाँचची घोषणा करण्यात आली आहे. हा फोन या महिन्यात ऑगस्टमध्ये लाँच होईल, असं म्हटलं जात आहे. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये लाँच केला जाईल. हा फोन चीनबाहेर लाँच होईल की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काय आहे फोनमध्ये खास?

कंपनीचा दावा आहे की OnePlus Ace 2 हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल, जो एरोस्पेस ग्रेड 3D कूलिंगसह येईल. टीझर रिपोर्टचा विचार केल्यास कंपनीने OnePlus Ace 2 च्या रॅममध्ये दोन वेरिएंटची घोषणा केली आहे. हा फोन 12 जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल. याशिवाय हा फोन 16 GB आणि 24 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये लाँच होणार आहे. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo च्या रिपोर्टनुसार, OnePlus Ace 2 चीनमध्ये ऑगस्टमध्ये लाँच होईल. यात एरोस्पेस ग्रेड डायमंड थर्मल कंडक्टिव्ह जेल आणि सुपरकंडक्टिव्ह थर्मल ग्रेफाइट थ्रीडी कुलिंग सिस्टीम दिली जाईल.

OnePlus Ace 2 Pro चे फीचर्स
या फोनमध्ये ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन 1.5K पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्टसह येईल. त्याचा पीक रिफ्रेश रेट सपोर्ट 120Hz आहे. हा फोन 12GB GB रॅम आणि 24GB LPDDR5x रॅम सपोर्टसह सादर केला जाईल. फोनमध्ये 1TB मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट दिला जाईल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5500mAh बॅटरी दिली जाऊ शकते. फोन 150W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तर फोनच्या मागील बाजूस 50 MP मुख्य कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच, 48 MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 32 MP टेलिफोटो लेन्स देण्यात येतील. फोन Android 13 आधारित ColorOS 13.1 वर काम करेल.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.