पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! भाभा अणु संशोधन केंद्रात १०५ पदांसाठी भरती सुरु

BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्राअंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदाच्या १०५ जागांसाठी BARC च्यावतीने भरतीची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या पद भरतीसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. तर, उमेदवारांना ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत या जागांसाठी अर्ज करता येणार आहेत.

सदर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण या संबंधित अधिकची माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

पदाचा तपशील :

पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow)

एकूण रिक्त जागा – १०५

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज आणि विद्यापीठामधून ६० टक्के गुणांसह फिजिक्स/ केमिस्ट्री/ लाईफ सायन्स विषयात पदवी (BSc)

किंवा

५५ टक्के किंवा त्याहून अधिक गुणांसह एमएससी (MSc) म्हणजेच + ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.

(वाचा : Pune ZP Recruitment: पुणे जिल्हा परिषदेतील एक हजार पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात)

वयोमर्यादा :

खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
(अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराच वय २८ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक)

अर्ज शुल्क :

खुला गट आणि ओबीसी वर्गातील उमेदवार – ५०० रुपये.
मागासवर्गीय आणि सर्व महिला उमेदवार – फी नाही.

नोकरी ठिकाण – मुंबईसह देशभरात

महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – ४ ऑगस्ट २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ऑगस्ट २०२३

(वाचा : Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती, अर्ज कसा करावा)

असा करा अर्ज :

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
  • उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  • इतर कोणत्याही वेबसाईटवर अथवा माध्यमातून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहीरात काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्यता प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत.
  • संपूर्ण अर्ज भरला झाल्यानंतर सर्व माहिती आवश्यक पडताळणी केल्यानंतर अंतिम अर्ज सबमिट करा.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ देण्यात आलेली आहे, याची नोंद उमेदवारांनी घ्यावी.
  • सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी जाहीरातीत देण्यात आलेल्या माध्यमातून बीएआरसीसोबत संपर्क साधावा.

Source link

BARC Junior Research Fellowbarc recruitment 2023barc.gov.inbhabha atomic research centrebhabha atomic research centre vacancyGovernment jobjob for bsc and msc studentsjob for science graduatesjob openingsJunior Research Fellow
Comments (0)
Add Comment