‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ मध्ये भरती! जाणून घेऊया भरतीचे सर्व तपशील..

तुम्ही इंजिनियरिंग केलं असेल आणि सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीमध्ये ‘प्रकल्प अभियंता’ या पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखत प्रक्रिया होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ने आवाहन केले आहे. ही मुलाखत २५ ते २९ सप्टेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…

‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड’ भरती प्रक्रियेतील तपशील:

पदे आणि पदसंख्या:

प्रकल्प अभियंता – २० जागा
एकूण जागा – २०

शैक्षणिक पात्रता:

६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी किंवा त्या समकक्ष पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबधित पदाशी निगडीत २ वर्षांचा कामाचा अनुभव हवा. पात्रतेचे आणखी निकष जाणून घेण्यासाठी मूळ अधिसूचना पहावी. त्याची लिंक खाली जोडली आहे.

नोकरीचे ठिकाण: मुंबई

(वाचा: सातारा जिल्ह्यातील ६०० हून अधिक शाळा बंद करण्यासाठी सरकारच्या हालचाली! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान..)

वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमार्यादा ३० वर्षे, कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे तर राखीव प्रवर्गासाठी ५ वर्षे सवलत.

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे.

मुलाखतीचा पत्ता: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एल., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई ४०००२०.

मुलाखतीची तारीख: २५ ते २९ स्पटेंबर २०२३

या भरतीचे सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट: mrvc.indianrailways.gov.in

भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/PE%20Advertisement.pdf या लिंकवर क्लिक करा.

वेतनश्रेणी: ४० हजार रुपये.

मुलाखतीविषयी: या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतद्वारे घेण्यात येणार आहे. या मुलाखतीला उपस्थित राहणार्‍या उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही. मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.

(वाचा: MPSC PSI Bharti 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती! जाणून घ्या सविस्तर तपशील..)

Source link

mrvc jobmrvc project engineer postmrvc recruitmentMRVC Recruitment 2023mumbai railway vikas corporationmumbai railway vikas corporation recruitment
Comments (0)
Add Comment