निखिल धोत्रे असं या तरुणाचं नाव असून काही दिवसांपूर्वी त्यांचं पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झालं होतं. पत्नी गर्भवती असल्यानं बाळंतपणासाठी कोणत्या रुग्णालयात नाव नोंदवायचं यावरुन दोघांमध्ये वाद झाला होता. त्यांच्या भांडणात निखिलला भाऊ व वहिनी मध्ये पडले व त्यांनी निखिलच्या पत्नीला हार्पिक क्लिनर पाजले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या प्रकरणी पती निखिल धोत्रे, विकास धोत्रे आणि लक्ष्मी धोत्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाचाः निर्बंधाची हंडी फुटणार?; गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्र्याची बैठक
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच निखिलनं रविवारी पत्नीच्या ओढणीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. यावेळी एक सुसाइड नोट आढळून आली आहे, यात निखिलनं सासरच्या मंडळींवर आरोप केले आहेत. ‘सासरच्या लोकांनी खूप त्रास दिला त्यांच्यामुळंच आपण कर्जबाजारी झालो असून माझ्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर करावाई करावी,’ असं या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. तसंच, ‘आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई मी समजून माझ्या बाळाला सांभाळ, त्याची काळजी घे,’ असं यात लिहलं आहे.
वाचाः सोलापुरातील ‘या’ पाच तालुक्यात आजपासून अनलॉक; काय सुरू राहणार?
वाचाः महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबाला भरचौकात मारहाण