किंमत आणि उपलब्धता
हा प्रोजेक्टर डिस्काउंट नंतर ११९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्रोजेक्टर खरेदीवर १२ महिन्यांची वॉरंटी मिळत आहे. हा कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवरून विकत घेता येईल. तसेच ग्राहक हा प्रोजेक्टर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतील.
हे देखील वाचा: ३४ हजारांमध्ये आयफोन! परवडणाऱ्या iPhone SE 3 ची किंमत आणखी कमी, पाहा ऑफर
स्पेसिफिकेशन्स
ह्या प्रोजेक्टरचं स्क्रीन प्रोजेक्शन २५० इंचापर्यंत आहे. म्हणजे एका मिनी थिएटर सारख्या मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहता येतील. ह्या प्रोजेक्टरमध्ये शार्प फुल एचडी १०८० पिक्सल रेजोल्यूशन मिळतं. प्रोजेक्टरवर आवडीचा ओटीटी चित्रपट, टीव्ही शोज पाहता येतील. ह्यात ३२०० ल्युमेन्स पर्यंतची ब्राइटनेस मिळते. प्रोजेक्टर मध्ये इंटेलिजंट इन-बिल्ट सेन्सर आहे, जो वर्टिकल कीस्टोन आणि फोकस एडजस्टमेंटसह स्टॅन्ड किंवा ट्रायपॉडविना ८.१ मीटरपर्यंत जवळपास कोणत्याही अँगलवर ठेवता येतो.
हे देखील वाचा: WhatsApp Group Calling: व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगमध्ये मोठा बदल; एका क्लिकमध्ये संपूर्ण ग्रुपला करा कॉल
हा लॅपटॉप आणि मीडिया प्लेयर्सशी कनेक्ट करता येईल. ह्यात दोन एचडीएमआय पोर्ट देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जुन्या डीव्हीडी प्लेयर, सेट-टॉप बॉक्ससाठी एव्ही इनपुट देखील आहे. तुमच्या होम व्हिडीओजसाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो. प्रोजेक्टरमधील व्हायरलेस स्क्रीन मॉनिटरिंग फीचर तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपला पोर्टेबल एंटरटेनमेन्ट हबमध्ये रूपांतरित करतो. ह्यात ५ वॉटचे इंटरनल स्पिकर ऑडियो देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या चित्रपट प्रेमींना ओटीटी वरचा कंटेंट देखील चित्रपटगृहाच्या माहोलमध्ये पाहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा डिवाइस बेस्ट आहे.