‘पनवेल महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी भरती २०२३’ मध्ये पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी – ०७ जागा
एकूण पद संख्या – ०७ जागा
शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता असलेल्या शिक्षण संस्थेतून ‘एमबीबीएस’ परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संबधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
(वाचा: इंजिनिअर झालेल्या ‘या’ मुलीने दुसर्याच प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक! वाचा अंशिका वर्माचा प्रेरणादायी प्रवास..)
वेतन: मासिक ६० हजार रुपये
नोकरी ठिकाण: पनवेल
वयोमर्यादा: कमाल ७० वर्षे
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल -४१०२०६
मुलाखतीची तारीख: ०४ ऑक्टोबर २०२३ (आणि पुढे प्रत्येक बुधवारी)
या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
तसेच वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया: या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला म्हणजेच ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत (आणि त्या नंतरच्या प्रत्येक बुधवारी) मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहावे. तसेच मुलाखतीस येताना उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. कागदपत्रांचे तपशील अधिसूचनेत दिलेले आहेत. मुलाखतीला येण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Pune District Court Bharti 2023: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदाची भरती! चुकूनही चुकवू नका संधी..)