Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पनवेल महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती! आजच करा अर्ज..

13

तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असून एका चांगल्या नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. पनवेल महापालिका येथे भरतीप्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे ‘वैद्यकीय अधिकारी’ या पदाच्या एकूण ०७ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत माध्यमातून नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. ही मुलाखत ४ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार आहे. या भरतीसाठीची पात्रता, वेतन, वय आणि सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

‘पनवेल महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी भरती २०२३’ मध्ये पदे आणि पदसंख्या:
वैद्यकीय अधिकारी – ०७ जागा
एकूण पद संख्या – ०७ जागा

शैक्षणिक पात्रता: महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता असलेल्या शिक्षण संस्थेतून ‘एमबीबीएस’ परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील संबधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

(वाचा: इंजिनिअर झालेल्या ‘या’ मुलीने दुसर्‍याच प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक! वाचा अंशिका वर्माचा प्रेरणादायी प्रवास..)

वेतन: मासिक ६० हजार रुपये

नोकरी ठिकाण: पनवेल

वयोमर्यादा: कमाल ७० वर्षे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: पनवेल महानगरपालिका (मुख्यालय), वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल -४१०२०६

मुलाखतीची तारीख:
०४ ऑक्टोबर २०२३ (आणि पुढे प्रत्येक बुधवारी)

या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

तसेच वैद्यकीय अधिकारी पदाच्या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया: या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला म्हणजेच ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत (आणि त्या नंतरच्या प्रत्येक बुधवारी) मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहावे. तसेच मुलाखतीस येताना उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे. कागदपत्रांचे तपशील अधिसूचनेत दिलेले आहेत. मुलाखतीला येण्याआधी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Pune District Court Bharti 2023: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदाची भरती! चुकूनही चुकवू नका संधी..)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.