Lava O1 ची किंमत
भारतात Lava O1 चा एकमेव मॉडेल आला आहे. फोनच्या ४जीबी रॅम+६४जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनची किंमत ६,९९९ रुपये आहे. मोबाइलवर ब्रँड १० टक्के सूट देत आहे. म्हणजे तुम्ही हा फक्त ६,२९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा ७ ऑक्टोबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान खरेदीसाठी उपलब्ध होईल. तसेच फोन लाइव्हली लव्हेंडर, प्रिज्म ब्लू आणि लक्स रेड सारखे तीन कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा: Google ची कमाल! स्मार्टवॉचमध्ये २जीबी रॅम; इतकी आहे Google Pixel Watch 2 ची किंमत
Lava O1 चे स्पेसिफिकेशन्स
Lava O1 फोनमध्ये युजर्सना ६.५ इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो १६००×७२० पिक्सल रिजॉल्यूशन, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि वॉटर ड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आली आहे. Lava O1 स्मार्टफोनचे डायमेंशन १६३.७ × ७५.३ × ९.३एमएम आणि वजन १९९.५ ग्रामचा आहे.
हा नवीन लावा डिवाइस अँड्रॉइड १३ वर चालतो. स्मार्टफोनमध्ये UniSoC T606 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी माली जी५७ जीपीयू मिळतो. सोबत ४जीबी रॅम+६४जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर ३जीबी एक्सटेंडेड रॅमच्या मदतीनं एकूण ७जीबी पर्यंत रॅम वाढवता येतो.
हे देखील वाचा: अनलिमिटेड ५जी डेटासह Jio चे ३ नवीन प्रीपेड प्लॅन लाँच; मोफत SonyLiv आणि Zee5 चं सब्सस्क्रिप्शनही
डिवाइसमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा AI लेन्स आणि एलईडी फ्लॅशसह मिळते. तसेच, सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पावर देण्यासाठी ५०००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट मिळतो. मोबाइलमध्ये १८वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. मोबाइलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ४जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि ३.५mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स मिळतात.